Friday, May 10, 2024

Latest Posts

झोमॅटो, ब्लिंकिट आणि नेटफ्लिक्सने मार्केटिंगसाठी लढवली शक्कल, अनोख्या ‘बिलबोर्ड वॉर’ला सोशल मीडियावर मिळतेय पसंती

याची सुरुवात ब्लिंकिट आणि झोमॅटोने केली होती आणि नंतर त्यात स्ट्रीमिंग अॅप देखील सामील झाले. या बिलबोर्ड जाहिराती २०२२ च्या बॉलीवूड चित्रपट 'मां तुझे सलाम'च्या संवादावर आधारित आहेत.

मार्केटिंगचे जग सध्या भरभराटीला येत आहे. झोमॅटो, स्वीगी, नेटफ्लिक्स आणि ब्लिंकिंटसारखे ब्रँड सहसा त्यांच्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी दरवेळी नवनवीन मार्ग शोधात असतात. सध्या या कंपन्यांनी मार्केटिंगसाठी अशीच एक शोधून काढलेली एक अनोखी शक्कल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडे, ब्लिंकिट, झोमॅटो आणि नेटफ्लिक्स यांच्यात एक मनोरंजक कॉलॅब घडला होता आणि हा कॉलॅब सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अॅप्सनी बॉलीवूड चित्रपटाचे संवाद बदलले आणि एक मजेदार वर्डप्ले सुरू केला. याची सुरुवात ब्लिंकिट आणि झोमॅटोने केली होती आणि नंतर त्यात स्ट्रीमिंग अॅप देखील सामील झाले. या बिलबोर्ड जाहिराती २०२२ च्या बॉलीवूड चित्रपट ‘मां तुझे सलाम’च्या संवादावर आधारित आहेत.

किराणा माल वितरण सेवा ब्लिंकिटच्या बिलबोर्डवर लिहिले आहे, “दूध मांगोगे, दूध देंगे (दूध मागाल, दूध देऊ)”, झोमॅटोच्या बिलबोर्डवरील घोषवाक्य काहीसे फिल्मी होते. त्यांनी लिहिले होते, “खीर मांगोगे, खीर देंगे (खीर मागाल, खीर देऊ).” यानंतर नेटफ्लिक्स या बिलबोर्ड वॉरमध्ये सामील झाल्यनानंतर, त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध वेनस्डे या सीरिजला उद्देशून एक वाक्य लिहिले. ते म्हणाले, “फ्रायडे मांगोगे, वेनस्डे डेंगे.” (शुक्रवार मागाल, बुधवार देऊ).

या कंपन्यांचे हे बिलबोर्ड वॉर इथेच संपले नाही तर ते पुढे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सुरु राहिले. ज्यात “बिंज देखो करोगे, पॉपकॉर्न हम ला देंगे,” ब्लिंकिटने लिहिले. यावर नेटफ्लिक्सने उत्तर दिले, “आमच्यासाठी शिफारस केलेले: हम आपके हैं कॉर्न.” दुसरीकडे नेटफ्लिक्सच्या या टिपण्णीवर झोमॅटोने लिहिले, “ इट्स वेन्सडे आफ्टरऑल.” यावर नेटफ्लिक्सने उत्तर दिले, “शी वूड गिव्ह यू अ बिग हॅन्ड फॉर दिस”

हे ही वाचा:

एअर इंडियाच्या विमानात पुन्हा घडली तीच किळसवाणी घटना, पुन्हा पुरुषाकडून महिलेच्या ब्लॅंकेटवर…

बर्थडे गर्ल दीपिका पदुकोणचे काही खास फोटो, आणि तिच्या सिनेसृष्टीमधील पदार्पणासंदर्भात खास माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss