Sunday, May 5, 2024

Latest Posts

मोदी-शाहांसह बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

दिल्ली पोलिसांना २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister Amit Shah) अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे दोन पीसीआर कॉल आले होते.

दिल्ली पोलिसांना २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री (Union Home Minister Amit Shah) अमित शाह आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांना जीवे मारण्याची धमकी देणारे दोन पीसीआर कॉल आले होते. दिल्लीतील मादीपूर मतदारसंघातील रहिवासी सुधीर शर्मा याने हे कॉल (Threat Call) केले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली आहे. यानंतर, दिल्लीतल्या मादीपूर येथे राहणाऱ्या सुधीर शर्माला शोधण्यासाठी पोलिसांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेला एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “धमकीच्या कॉलला तत्काळ प्रतिसाद देत, निनावी कॉल करणाऱ्याचे ठिकाण शोधण्यासाठी एक टीम त्वरीत तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे बघणे गरजेचे ठरणार आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला दारु पिण्याची सवय असल्याचा अंदाज आहे. दिल्ली पोलिसांना आलेल्या कॉलवेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत असावा, असा अंदाज पोलिसांनी लावला आहे. आरोपीच्या आवाजावरुन पोलिसांनी हा अनुमान लावला. दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या घरापर्यंत पोहोचत कुटुंबियांची चौकशी केली असता त्याला दारु पिण्याची सवय असल्याचे त्याच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणाचा सर्वसमावेशक तपास पोलिसांनी सुरु केला असून संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून सुरु आहे.

दिल्ली पोलिसांना असा धमकीचा फोन येण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यात, एका व्यक्तीला असाच बनावट कॉल केल्याबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकीचा इशारा दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. हेमंत कुमार असे फोन करणाऱ्याचे नाव असून तो करोलबागमधील रायगर पुराचा रहिवासी होता. गेल्या महिन्यात हेमंत कुमार या निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीचा दिल्ली पोलिसांनी तातडीने तपास लावला आणि त्याला पोलीस ठाण्यात आणून त्यांची संयुक्त चौकशी करण्यात आली, असे नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांनी सांगितले. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रणव तायल यांच्या म्हणण्यानुसार, मागील महिन्यात पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी गेल्या सहा वर्षांपासून बेरोजगार होता आणि त्याला दारु पिण्याची सवय होती. कॉल करताना देखील निनावी कॉलर हेमंत कुमार दारुच्या नशेत होता, असेही त्याने पुढे सांगितले.

हे ही वाचा:

योगादिनाचे औचित्य साधत प्राजक्ताने घातले १०८ सूर्यनमस्कार…

लोअर परेलमध्ये इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून लिफ्ट कोसळली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss