Sunday, May 5, 2024

Latest Posts

अयोध्यातील रामलालाच्या प्राणप्रतिष्ठा दिवशी महाराष्ट्रात २२ जानेवारीला साजरी होणार दिवाळी, मुख्यमंत्र्यांचे पालिकांना आदेश

अयोध्यातील राम मंदिराची प्राणपतिष्ठापना २२ जानेवारीला होणार आहे.

अयोध्यातील राम मंदिराची प्राणपतिष्ठापना २२ जानेवारीला होणार आहे. अवघ्या देशवासियांसाठी हा दिवस आनंदाचा असणार आहे. या पार्शवभूमीला राज्यभरात दिवाळी साजरी होणार आहे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्ताना दिले आहेत. २२ जानेवारीला राम मंदिराचा सोहळा पार पडणार आहे. मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी. मंदिर आणि प्रमुख इमारतींना रोषणाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्ताना दिले आहेत. मुंबईतील वेगेवेगळ्या १० ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात डीप क्लीन ड्राईव्ह या उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून झाले होते, त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्ताना सूचना दिल्या आहेत.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईला स्वच्छ करताना प्रदूषण रोखण्यासाठी देखील काम करायचं आहे. मोठ्या प्रमाणात झाड लावली पाहिजेत. ज्या ठिकाणी काम सुरू असल्याने झाड कापली जातात. त्याबदल्यात इतर ठिकाणी झाड लावली गेली. शिवडी न्हावा शेला हा प्रकल्प करताना एकही फ्लेमिंग आपल्या डून जाणार नाही, याची काळजी आम्ही घेतली, असे मुख्यत्र्यांनी सांगितले आहे.

मुंबईतील या १० ठिकाणी महास्वच्छता अभियान सुरु आहे.

गेट वे ऑफ इंडिया
वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती व उद्यान प्राणिसंग्रहालय, भायखळा पूर्व
सदाकांत धवन मैदान, भोईवाडा पोलिस स्थानकासमोर, नायगाव पूर्व
वांद्रे रेल्वे स्थानक पश्चिम
वेसावे (वर्सोवा) चौपाटी
गणेश घाट, बांगूर नगर लिंक रोड, गोरेगाव पूर्व
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रीडांगण, शिवसृष्टी, नेहरू नगर, कुर्ला पूर्व
अमरनाथ पाटील उद्यान, गोवंडी पूर्व
डी मार्ट जंक्शन, हिरानंदानी संकूल, पवई
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ड्रीम पार्क, ठाकूर गाव, कांदिवली (पूर्व)

हे ही वाचा:

भारताच्या प्रयत्नांमुळे २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरफडीचे जेल महिनाभर चेहऱ्यावर लावल्यास खूप फायदेशीर ठरते,जाणुन घ्या उपयोग

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss