Thursday, May 9, 2024

Latest Posts

प्राप्तिकराच्या सवलतीचे गाजर आणि, अर्थसंकल्पावर सामनातून भाजपवर हल्लाबोल

शिवसेनेचे मुखपत्र असेलेल्या सामनातुन (Saamana) शिवसेना ही कायम सरकारच्या निर्णयांवर किंवा राजकीय विषयांवर टीका करताना आढळले आहे. कालच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता. तर यावेळेस सामनातून सेनेने थेट अर्थसंकल्पावर भाष्य करत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv sena Thackeray Group) या आधी सुद्धा सामनातुन सरकारच्या अनेक निर्णयांवर टिका करण्यात आली होती. तर आता अर्थसंकप्लवर (Budget ) टीका करताना सामनात असे म्हंटले गेले आहे की “प्राप्तिकराच्या सवलतीचे गाजर आणि त्याची पुंगी वाजविणारा, मुंबई महाराष्ट्रावर अन्याय करणारा आणि निवडणूक असलेल्या राज्यांना झुकते माप देणारा हा राजकीय अर्थसंकल्प आहे.”अशा खोचक शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर हल्लाबोल केला आहे.

सामनाच्या अग्रलेखात अर्थसंकल्पावर असे लिहिले आहे की, “२०२४ ची लोकसभा आणि यावर्षी काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा अखेरचा पूर्णवेळ अर्थसंकल्प सादर केला.आणि यामधून देशात सगळं कसं कुशल मंगल आहे आणि देशातील तमाम वर्गाना सरकार कसे भरभरून देत आहे, असे ‘आभासी चित्र मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच एखादे लहान मूल चॉकलेटसाठी हट्ट धरून रडू लागले की, बऱ्याचदा पालक त्याला चॉकलेट तर देत नाहीत, पण उगाच गोंजारून, गुदगुल्या करून त्याचे लाड करतात. “उद्या देऊ हं”, अशी समजूत काढून वेळ मारून नेतात. या गुदगुल्यांच्या गुंगीने सुखावलेल्या मुलास चॉकलेटचे विस्मरण होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही या अर्थसंकल्पात निवडणुकीची वेळ मारून नेण्यासाठी देशवासीयांना असेच गुंगीचे औषध दिले आहे.” . अशा प्रकारे लहान मुलाच्या हाताचे उदाहरण देत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे.

तसेच सामनाच्या अग्रलेखात पुढे अर्थसंकल्पातील करपत्रात रकमेवर लिहिले आहे की “या सरकारच्या राजवटीत पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दुपटीने वाढलेले भाव आणि आज प्राप्तिकरात दिलेली फुटकळ सवलत यांचा कुठेच मेळ बसत नाही. सामान्य करदात्यांसाठी करपात्र रक्कम ५ लाखांवरून ७ लाखांवर नेण्याची घोषणा थोडीफार दिलासादायक असली तरी या निर्णयास खूप विलंब झाला आहे. म्हणजे चार वर्षे खिसे कापायचे आणि निवडणुकीच्या पाचव्या वर्षात त्याच खिशात थोडी चिल्लर टाकायची, असा हा प्रकार आहे,” असे म्हणत सरकारच्या करपात्र योजनेवरही सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

तीच तीच डाळ खाऊन कंटाळा आलाय?, तर बनवा साऊथ इंडियन स्टाईल रस्सम

उरलेल्या खिचडीपासून बनवा हि खास इटालियन डिश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss