Friday, May 3, 2024

Latest Posts

दहावीचा निकाला होणार जाहीर …

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची (SSC Class 10th Result 2023) दहावीचं निकाल कधी लागणार याबद्दल सर्वांचा उत्सुकता लागून राहिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची (SSC Class 10th Result 2023) दहावीचं निकाल कधी लागणार याबद्दल सर्वांचा उत्सुकता लागून राहिली आहे. दहावीच्या मुलांसोबत पालक देखील उत्सुक बघायला मिळत आहे. दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेसंदर्भात बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दहावीच्या निकालासंदर्भात विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. या परीक्षेला बसलेले लाखो विद्यार्थी आणि त्याच्या पालकांचं सारं लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.

दहावीच्या निकालाची (HSC Resut 2023) तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर येत आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. थोडक्यात काय तर, Maharashtra State Board कडून परीक्षांच्या निकालांसंबंधी सर्व तयारी पूर्ण झाली असून लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सात दिवस पुकारलेल्या संपामुळे दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला. त्यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होण्याची शक्यता आहे.

पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. या परीक्षेला बसलेले लाखो विद्यार्थी आणि त्याच्या पालकांचं सारं लक्ष आता बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणारी दहावीची लेखी परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेण्यात आली होती. यंदा दहावीच्या २३ हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परंतु मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल ६१ हजार ७०८ ने कमी झाली आहे. असे दिसून आले.

हे ही वाचा:

छगन भुजबळ यांची घणाघाती टीका

सावरकर चित्रपटाचा ट्रेझर वरून देवेंद्र फडणवीसांनी केले ट्विट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss