Sunday, May 5, 2024

Latest Posts

‘या’ जागी केली जाते झुरळांची शेती! सविस्तर वाचा

साप आणि कीटक त्यांचे खाद्यपदार्थ असतील तर त्यांचा पुरवठा असणे देखील आवश्यक आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी साप आणि कीटकांचीही शेती केली जाते.

आपल्या पृथ्वीवर अनेक वेगवेगळे देश आहेत. तसेच अनेक देशाची आपली अशी वेगळी शैली असते. प्रत्येक देशातील अनेक गोष्टी या इतर गोष्टींपेक्षा वेगळ्या असतात. मग ती वेळ असो , तेथील राहणीमान असो वा खाण्याचे पदार्थ असो. त्याचबरोबर अनेक देशातील काही गोष्टी या आपल्याला थक्क करून जातात.प्रत्येक प्रांतानुसार खाण्याच्या सवयींमध्ये (Food Habits) अनेक बदल आढळून येतात.जगातील काही लोक शाकाहारी (Vegetarians) आहेत, तर काही लोक मांसाहारी (Non-vegetarians). बऱ्याच जणांचे खाण्याचे पदार्थ असे असतात ज्यांची कल्पनाही करून शकत नाही. साप (Snake), कीटक (Insects) यांचे सेवन करणारे लोक देखील जगात आहेत. आता साप आणि कीटक त्यांचे खाद्यपदार्थ असतील तर त्यांचा पुरवठा असणे देखील आवश्यक आहे आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी साप आणि कीटकांचीही शेती केली जाते.

कीटकांच्या शेतीबद्दल ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असले तरी हे खर आहे आणि ही कीटकांची शेती दुसरीतिसरीकडे नसून तर चीन या देशात केली जाते. चीन हा देश आपल्या आगळ्यावेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. चीनमध्ये अनेक प्रकारचे प्राणी सर्रास खाल्ले जातात. कीटकांच्या शेतीबद्दल ऐकून तुम्हाला ते जर विचित्र वाटत असले तरी चीनमधील (China) लोकांसाठी हा एक फायदेशीर व्यवसाय आहे. जसे भारतात मत्स्य शेती (Fish Farming) केली जाते, मधुमाशी पालन केले जाते,कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म उभारले जातात, तशाच प्रमाणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात किडे-कीटक पाळले जातात. चीनमध्ये किड्यांची निर्मिती देखील केली जाते.

चीनमधील लोक कीटकांना प्रोटीन्सचा (proteins) मुख्य स्रोत मानतात म्हणूनच ते मोठ्या संख्येने हे कीटक पाळतात आणि नंतर स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून खातात. चीनमधील बाजारात हे एक स्ट्रीट फूड म्हणून विकले जाते. चीन आपल्या विचित्र खाद्यपदार्थांसाठी नेहमीच जगात प्रसिद्ध आहे. त्यातच आता चीन या कीटकांना फक्त खातच नाही तर त्यांची लागवडही करत असतं.

हे ही वाचा:

मुंबईसह मुंबई उपनगरात जोरदार पावसाची हजेरी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरा

पावसाळ्यात घरच्याघरी बनवा मस्त, खमंग ग्रीन मॅगी मोमोस

BMC कथित कोविड घोटाळा प्रकरणात आता SIT पथक ऍक्शनमोडमध्ये

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss