Tuesday, May 7, 2024

Latest Posts

LOKSABHA ELECTION चा दुसरा टप्पा; कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान? 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून  ११ वाजेपर्यंत मतदानाचा आकडा हा १८.८३ टक्के इतके मतदान पूर्ण झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ तारखेला पूर्ण झाले असून आज २६ एप्रिल २०२४ रोजी देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरातील १३ राज्यातील आज ८९ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील एकूण ८ मतदारसंघात हे मतदान होत असून चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आज सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४३ टक्के मतदान पूर्ण झाले असून ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, अकोला, परभणी, नांदेड या ८ मदारसंघात आज मतदान पार पडणार आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून  ११ वाजेपर्यंत मतदानाचा आकडा हा १८.८३ टक्के इतके मतदान पूर्ण झाले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान ?

  • वर्धा : १८.३० टक्के
  • अकोला : १७.३७  टक्के
  • अमरावती :१७.७३  टक्के
  • बुलढाणा : १७.९२  टक्के
  • हिंगोली : १८.१९  टक्के
  • नांदेड : २०.८४ टक्के
  • परभणी : २१.१७ टक्के
  • यवतमाळ-वाशिम :१८.०१  टक्के

आतापर्यंत या ८ जिल्ह्यात झालेल्या मतदानाची ही टक्केवारी आहे. दरम्यान वर्ध्यामध्ये भाजपकडून रामदास तडस विरुद्ध महाविकास आघाडीकडून अमर काळे हे रिंगणात उतरले आहेत. अकोल्यात वंचित बहूजन आघाडीकडून वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर मैदानात उतरले आहेत तर कॉंग्रेसकडून अभय पाटील तर भाजपकडून अनूप धोत्रे अशी तिरंगी लढत होणार आहे. बुलढाण्यात भाजपकडून प्रतापराव चिखलीकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर (ठाकरे गट) तर रविकांत तुपकर अशी तिहेरी लढत होणार आहे. अमरावतीत भाजपकडून नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे हे रिंगणात उतरल्याने अकोल्यासह अमरावतीत देखील तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. हिंगोलीत महायुतीकडून बाबूराव कदम असून महाविकास आघाडीमधून नागेश आष्टीकर तर वंचितचे डॉ.बी.डी.चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. नांदेड मध्ये महायुतीमधून (भाजप) प्रताप पाटील चिखलीकर असून कॉंग्रेस कडून वसंत चव्हाण हे उमेदवार आहेत. परभणीमधून रासपचे महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव हे ठाकरे गटाकडून रिंगणात उतरले आहेत. हेमंत पाटील यांची पत्नी राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाकडून संजय जाधव अशी लढत यवतमाळ-वाशिम मध्य पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

BJP ला हद्दपार करणे हे लक्ष्य, आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे, Balasaheb Thorat यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Exclusive Interview of Arvind Sawant: PM Modi यांना माणुसकीचा कोपरा जरा कमीच, ते कधीच…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss