Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Sara ali khan चा चित्रपट पाहून आई अमृता आणि भाऊ इब्राहिम झाले इमोशनल

'जरा बचके जरा हटके' (Zara hatke zara bachake) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसवर चंगळ गल्ला जमावाला आहे.

‘जरा बचके जरा हटके’ (Zara hatke zara bachake) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसवर चंगळ गल्ला जमावाला आहे. इतर बाॅलिवूड चित्रपटांच्या तुलनेत या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हा मिळताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असणाऱ्या सारा अली खानचे प्रेक्षक कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या चित्रपटामध्ये सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे.

‘जरा बचके जरा हटके’ या चित्रपटामध्ये सारा अली खानच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने तीन दिवसांमध्ये २२ कोटींची कमाई केली आहे. सारा आणि विकीने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. सारा अली खान ही ‘जरा बचके जरा हटके’ चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये आई अमृता आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत गेली होती. यामध्ये खास म्हणजे सर्वसामान्य लोकांसोबत तिने चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला.

त्यानंतर सारा अली खान माध्यमांशी बोलताना म्हणाली की, चित्रपट बघताना माझी आई आणि माझा भाऊ कधी हॅप्पी, इमोशनल तर कधी थेट रडले आहेत. साराने तिचाच चित्रपट पाहतानाच अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला. ‘जरा बचके जरा हटके’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळात आहे आणि हे पाहून सारा खूप आनंदी आहे. हा चित्रपट हिट ठरताना दिसत आहे. त्याचबरोबर साराने तिचा चित्रपट पाहण्यासाठी आल्याबद्दल सारा अली खान हिने आई आणि भावाचे आभार देखील मानले आहेत.

हे ही वाचा:

Odisha Train Accident मध्ये बचावलेल्या नागरिकांसाठी Reliance Foundation चा हातभार

Rahul Gandhi म्हणाले, एकीकडे Mahatma Gandhi, तर दुसरीकडे Nathuram Godse…

Watch Video, Odisha Train Accident नंतर तब्ब्ल ५१ तासानंतर पहिली ट्रेन धावली, अन् रेल्वेमंत्र्यांनी जोडले हात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss