Friday, June 2, 2023

Latest Posts

Khatron Ke Khiladi 13 मधील रोहित रॉय जखमी

अनेकांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच 'खतरों के खिलाडी 13'च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला अखेर सुरुवात ही झाली आहे. या शो ची शूटिंग ही दक्षिण आफ्रिकेत सुरु आहे.

अनेकांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच ‘खतरों के खिलाडी 13’च्या (Khatron Ke Khiladi 13) शूटिंगला अखेर सुरुवात ही झाली आहे. या शो ची शूटिंग ही दक्षिण आफ्रिकेत सुरु आहे. परंतु या शूटिंगदरम्यान एक अपघात हा झाला आहे. स्टंटबाजी करताना अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) जखमी झाला आहे. तसेच अभिनेता रोहित रॉय याला मुंबई देखील रावण करण्यात येणार आहे अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.

‘खतरों के खिलाडी 13’च्या शूटिंग दरम्यान अभिनेता रोहित रॉय याला दुखापत झाली आहे. तसेच रोहित रॉयने ‘खतरों के खिलाडी 13’चं (Khatron Ke Khiladi 13) शूटिंग पूर्ण करावं, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. परंतु त्याला जी जखम झाली आहे ती बारी होण्यास जास्त कालावधी लागू शकतो. तसेच अभिनेता रोहितला देखील हा कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. तसेच रोहित ला जी दुखापत झाली आहे त्यामुळे त्याला मुंबई हलवण्यात देखील येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अभिनेता रोहित रॉय हा नक्की कोणता स्टंट करत असताना जखमी झाला या बाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. तर काही दिवसांपूर्वी हे स्टंट करत असताना ऐश्वर्या शर्मालादेखील दुखापत झाली होती. एकीकडे रोहित रॉय हा जखमी झाला आहे. तर दुसरीकडे पुढील काही भागांमध्ये रोहित रॉय हा दिसणार त्यामुळे त्याचा चाहता वर्ग देखील नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे.

 

तसेच ‘खतरों के खिलाडी 13’या शोमध्ये सहभागी होण्याबद्दल रोहित रॉय (Rohit Roy) म्हणालेला,”खतरों के खिलाडी 13’मध्ये स्टंट करताना निर्माते स्पर्धकांची खूप काळजी घेतात. स्टंटबाजी करताना मलादेखील स्वत:ची काळजी घ्यायला हवी. साहसी खेळादरम्यान सुरक्षिततेला महत्त्व द्यायला हवं”.

नाव करेल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss