Wednesday, May 8, 2024

Latest Posts

… कुणी आंटी तर कुणी बुड्ढी बेबो बोलतंय, अभिनेत्री करिना कपूर होतेय ट्रोल

अभिनेत्री करीना कपूर खान ( Actress Kareena Kapoor Khan ) बॉलीवूड फॅशन आयकॉन ( Bollywood fashion icon ) आहेच शिवाय वयाच्या चाळीशीनंतरही एक फीट अशी अभिनेत्री आहे.

अभिनेत्री करीना कपूर खान ( Actress Kareena Kapoor Khan ) बॉलीवूड फॅशन आयकॉन ( Bollywood fashion icon ) आहेच शिवाय वयाच्या चाळीशीनंतरही एक फीट अशी अभिनेत्री आहे. करिना आपल्या फीटनेसची जरा जास्तच काळजी घेताना दिसते. सर्वसामान्य चाहतेच नाहीत तर बॉलीवूडचे कितीतरी सेलिब्रिटी करिनाच्या फिटनेसचे आणि सौंदर्याचे दिवाने आहेत. आता नुकताच करिनाचा एक व्हिडीओ ( Video ) समोर आला आहे, ज्यात ती योगा करताना दिसत आहे.

अभिनेत्री करीना कपूरच्या या व्हिडीओला करिनाच्या योगा प्रशिक्षकानं शेअर केलं आहे. व्हिडीओला पाहिल्यानंतर एकीकडे जिथे करिनाचे चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाही आहेत तर तिथे दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल (Troll) करायला सुरुवात केली आहे. ट्रोलर्स करिनाविषयी अगदी काहीही उलट-सुलट बोलताना दिसत आहेत. कोणी तिला आंटी बोलत आहे तर कुणी म्हणतंय, म्हातारपणात फक्त योगा करुन काही नाही होत. तर कुणी तिला ‘बुड्ढी बेबो’ म्हणून संबोधलं आहे. अर्थात यामुळे आता सोशल मीडियावर करिनाचे चाहते विरोधात ट्रोलर्स अशी खडाजंगी सुरू आहे. तिचे चाहते म्हणतायत, ‘वयाच्या चाळीशीत इतकं सुंदर राहणं आणि फिट दिसणं तेही इतक्या व्यस्त शेड्युलमधून…कोणालाही सहज शक्य होत नाही ते करिना करुन दाखवतेय’. (Video Gets Comments)

 

View this post on Instagram

 

A post shared by ANSHUKA YOGA (@anshukayoga)

तसंही करिना कपूरला ट्रोलिंगमुळे काहीच फरक पडत नाही. ती कितीतरी वेळेला ट्रोलिंगची शिकार झाली आहे. आणि तिनं म्हटलं देखील आहे की ती नकारात्मक गोष्टींकडे ढुंकूनही लक्ष देत नाही.

 

हे ही वाचा:

श्रीवल्ली उर्फ ​​रश्मिका मंडन्नाने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

आज नीट युजी २०२२ चा निकाल होणार जाहीर

दिव्यांग स्वीगी डिलिव्हरी गर्लचा सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय तुफान वायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss