Friday, April 26, 2024

Latest Posts

Box Office वर सुपरहिट ठरणाऱ्या ‘The kerla story’ साठी अदाने घेतले ‘इतके’ मानधन

सध्या दि केरळ स्टोरी हा चित्रपट भलताच चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिस वर तर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तब्बल १५० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट वाद्याच्या भोवऱ्यातसुद्धा अडकला असून या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला.

सध्या दि केरळ स्टोरी हा चित्रपट भलताच चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिस वर तर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तब्बल १५० कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट वाद्याच्या भोवऱ्यातसुद्धा अडकला असून या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला. अनेक लोकांची या चित्रपटास पसंती मिळाली तर काही लोकांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. अनेकजणांनी या चित्रपटावर अनेक आरोप केले. हा चित्रपट एक प्रोपोगांडा असल्याचे काही जणांकडून म्हंटले जाते. हा चित्रपट सुदिप्तो सेन यांनी दिग्दर्शित केला असून विपुल अमृतलाल सेन यांची निर्मिती आहे. हा चित्रपट केरळच्या हजारो मुली या लव्हजिहादमध्ये अडकून ISIS ला सामील होतात अश्या या सत्य घटनेवर अवलंबून आहे. या चित्रपटात अदाह शर्मा या अभिनेत्रीने प्रमुख भूमिका बजावली आहे.

अदाह शर्मा हिने याआधीही बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००८ साली तिने 1920 नावाचा चित्रपट करून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं. अदाह ने आजपर्यंत हिंदी, कन्नड, तेलगू, तामिळ अश्या विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने जास्त सिनेमात काम केलं नाही. पण ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या दि केरळ स्टोरी या चित्रपटामध्ये अदाह ने अतिशय सुंदररित्या काम केले आहे. या तिच्या अभिनयासाठी तिचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

दि केरळ स्टोरी या चित्रपटातून अदाह ने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर सध्या तिचीच चर्चा चालू आहे. त्यामुळे अनेक जण हे तिची लाइफस्टाइल जाणून घेण्यात उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवर तब्बल १५० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटात काम करण्यासाठी अदहने किती मानधन घेतले हे जाणून घेण्याची सुद्धा प्रत्येकालाच उत्सुकता आहे. दि केरळ स्टोरी या सुपरहिट चित्रपटासाठी अदहने तब्बल एक कोटी मानधन घेतल्याची सर्वत्र चर्चा आहे.

हे ही वाचा : 

Orange Cap आणि Purple Capच्या शर्यतीत एका सामन्यामुळे झाला फेरबदल | IPL 2023 |

ये रे ये रे पावसा…!, पुढील २४ तासात अंदमानात पावसाचे होणार आगमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss