Friday, April 26, 2024

Latest Posts

‘Phakaat’ चित्रपट झाला प्रदर्शित, तरुणांनी सांगितला अर्थ

सध्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

सध्या श्रेयश जाधव दिग्दर्शित ‘फकाट’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खरंतर ‘फकाट’ या शब्दाचा अर्थ काय, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ‘फकाट’ म्हणजे नेमकं काय याचे उत्तर जरी प्रेक्षकांना २ जूनपासून मिळत असले तरी आपल्या काही तरुण मंडळींनी त्यांच्या मते ‘फकाट’ म्हणजे काय सांगितले आहे. नुकताच हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून अनेकांनी ‘फकाट’ चे गंमतीशीर अर्थ सांगितले आहेत

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 चित्रपटाच्या टीमने काही तरुणांना ‘फकाट’चा अर्थ विचारला यावर या तरुण मंडळींनी भन्नाट उत्तरे दिली आहेत. ‘फकाट’ म्हणजे सुसाट सुटणारा, स्वावलंबी, स्वतःच्या धुंदीत राहणारा, गावाकडून आलेला एखादा मुलगा ज्याला व्यसनं लागून तो ‘फकाट’ झाला, ‘फकाट’ असे अनेक मजेशीर अर्थ या व्हिडीओमध्ये सांगितले आहेत.

दरम्यान वक्रतुंड एंटरटेनमेंट्स, गणराज स्टुडिओज प्रस्तुत, नीता जाधव निर्मित या चित्रपटात हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अनुजा साठे, रसिका सुनील, अविनाश नारकर, नितीश चव्हाण, महेश जाधव, किरण गायकवाड आणि कबीर दुहान सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे हे सगळे कलाकार लवकरच सिनेमागृहात कॉन्फिडेन्शिल धिंगाणा घालणार आहेत. तसेच ‘फकाट’च्या निमित्ताने कबीर दुहान सिंग मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तो नकारात्मक भूमिकेत दिसत असून त्याचा एक वेगळाच दरारा या चित्रपटात दिसत आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Brijbhushan Singh यांना ९ जूनपर्यत अटक करावी, राकेश टीकेत यांचा सरकारला इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss