Monday, May 20, 2024

Latest Posts

राज्यात गणेश विसर्जनावेळी अनेक दुर्घटना

काल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दोन वर्ष कोरोनामध्ये अनेक गणेश भक्तांना गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये आनंद घ्यायला मिळाला नाही पण या वर्षी गणेश भक्तांनी मोठ्या आनंदाने बाप्पला निरोप दिला.

काल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दोन वर्ष कोरोनामध्ये अनेक गणेश भक्तांना गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये आनंद घ्यायला मिळाला नाही पण या वर्षी गणेश भक्तांनी मोठ्या आनंदाने बाप्पला निरोप दिला. पण काही गणेश मूर्ती विसर्जना वेळी अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्यचे समोर येत आहेत. या आनंदाच्या वातावरणात कुठे तरी भाविकांना अनेक दुर्घटनांना सामोरे देखील जावे लागले.

पनवेल मध्ये ११ जणांना विजेचा झटका – 
पनवेलमध्ये काल ११ जणांना विजेचा झटका लागल्याची घटना घडली आहे. गणेश भक्त बाप्पाला निरोप देण्याकरिता कोळी वाडा गणेश घाटावर विसर्जनासाठी गेले असताना जनरेटरमधील वायर तुटून ११ गणेश भक्तांना विजेचा जबर झटका बसला. ही घटना रात्री ८ वाजल्याच्या सुमारास घडल्याची माहिती मिळत आहे आणि या घटनेमध्ये लहान मुलांचा समावेश होता असे सांगण्यात येत आहे. दुर्घटना झालेल्यांमध्ये २ जणांची प्रकृती गंभीर असलाचे समजत आहे. तर बाकी ८ जणांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नायगाव तालुक्यात एक मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू – 
नायगावयेथे गणपती विसर्जनासाठी गेलेल्या मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मुलाचा नाव शिवकुमार असून त्याचं वय (२१) होतं. गावामधल्या नागीराकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनी संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुण्यामध्ये सुद्धा २१ वर्षाच्या मुलाचा गणपती विसर्जनासाठी गेला असताना विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. संकेत सहदेव म्हात्रे (२१) असे मृत झालेल्या मुलाचा नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार संकेत गणपतीच्या विसर्जनासाठी गेला असता ३ तास उलटू गेले होते. ३ तसाच्या प्रतीक्षेनंतर संकेतच्या घरच्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले व विहिरीत शोध मोहीम राबवली. अथक प्रत्यानानंतर संकेतचा मृतदेह विहिरीत सापडला.

तर ठाण्यामध्ये कोलबाड भागात असलेल्या गणपती मंडळावर झाड पडले. या घटनेमध्ये एका गणेश भक्ताचा मृत्यू तर काही जण जखमी असल्यची माहिती मिळत आहे. यात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव राजश्री वालावलकर (५५) असे आहे. शुक्रवार संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. याच येळी ८ च्या सुमारास मंडपावर झाड पडले आणि एकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. या घटनेमध्ये दोन वाहनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याचे समोर येत आहे. संध्याकाळी ८ वाजता आरती सुरु असताना मंडपावर झाड पडला अशी माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्था सरसावल्या, अमित ठाकरे सह सेलेब्रिटींनीही घेतला पुढाकार

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी केले हात साफ, तब्ब्ल ५० फोन अन् दागिन्यांची चोरी!

पुढच्या वर्षी लवकर या… मुंबईतील लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss