Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Gudi padwa २०२३, या गुढीपाडव्याला हा मॉडर्न लुक तुम्हाला नक्की ट्राय करायला हवा

मराठी महिन्यांची सुरुवात चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. भारताच्या पश्चिम भागामध्ये विशेषता महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो.

मराठी महिन्यांची सुरुवात चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. भारताच्या पश्चिम भागामध्ये विशेषता महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. कोणत्याही सणाच्या वेळी घराला सजवण्यासाठी आपण मागे पुढे पाहत नाही, तर मग या वर्षी या गुढीपाडवा साजरा करताना आपल्या लुक वर पण लक्ष दिले पाहिजे. या वर्षीचा गुढीपाडवा साजरा करताना आपला फॅशन सेन्स outdated वाटायला नको. म्हणून सेलिब्रिटींनच्या फॅशन सेन्सला नक्की फॉलो करू शकतो.

महाराष्ट्रामध्ये सहसा सणाला स्त्रिया साडी किंवा नऊवारी नेसतात. प्रश्नच नाही कारण महाराष्ट्रीयन लोक जगामध्ये भारीच, यावर्षी जर गुढीपाडव्याला नववारी नसणार असाल तर टेलिव्हिजन इंडस्ट्री मधल्या सेलिब्रिटींना फॉलो करायला विसरू नका. साडीवर किंवा नववारी वर कोणते दागिने आणि मेकअप करावा हे सुद्धा जाणून घेऊया.

टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचा महाराष्ट्रीयन लूक

महाराष्ट्रीयन लुक flaunt करताना अंकिता लोखंडे नेहमी दिसते. तिच्या सारखं aesthetic look करायच असेल तर सिल्क साडी वर सेम रंगाच पण एम्ब्रॉयडरी बॉर्डर वालं designer ब्लाउज आणि सोबत शॉल घ्यायला विसरू नका. या वर टेंम्पल किंव्हा ऑक्सिडाईज दागिने शोभुनं दिसेल.

रूपाली गांगुलीचा लुक

एका सणाला रुपालीने नऊवारी साडी मध्ये आपण बघितल. रुपाली गांगुलीचा महाराष्ट्रीयन लुक सगळ्यांनाच खूप आवडला होता. सर्वांची लाडकी अनुपमा म्हणजेच रुपाली हिरव्या रंगाच्या नऊवारी मध्ये गोड दिसत आहे. सांगण्याचा अर्थ असा की मॉर्डन लुक हवा असेल तर साडी आणि ब्लाउज कॉन्ट्रास्ट असलेलं चांगल. म्हणजे हिरव्या रंगाच्या नऊवारी वर लाल रंगाच ब्लाउज शोभेल. या साडीवर गोल्डन रंगाचे दागिने ज्यामध्ये ठुशी, मोहन माळ, बाजीराव मस्तानी नथ, लॉग झुमके नक्की ऍड करा. मेकअप सोबर ठेवून लिपस्टिक शेड हलका डार्क ठेवा. हेअरस्टाइल मध्ये, अंबाडा घालून २ गुलाबाचे फुलं नक्की लावा.

गुढीपाडव्याच्या लुक तयार करण्यासाठी आणखी काय करू शकतो?

नऊवारी नेसल्यांनंतर मेकअप, दागिने आणि हेअरस्टाइल या सर्व गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. लाल चंद्रकोर, ब्लॅक काजळ आणि लाइनर अर्थात आय मेकअप शिवाय तुमच गेटअप अपुरं राहिल म्हणुन या कडे लक्ष द्या. हेअरस्टाइल जर मेसी करणार असाल तर ऑर्किड किंवा लहान पांढरी कृत्रिम फुले शोभुन दिसतील. आणि केसांच्या मधून भांग पडणार असाल तर matching bindi छानं दिसेल.

हे ही वाचा:

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ‘चुनावी जुमला’ असलेला अर्थसंकल्प, अजित पवारांची टीका

पीएम गृहनिर्माण योजनेबाबत मोठी बातमी, योजनेच्या रकमेत करण्यात आली ७९ हजार कोटींची वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss