Sunday, May 5, 2024

Latest Posts

यंदा मकर संक्रांतिचा शुभ मुहुर्त कोणता आणि काय ?महत्त्व जाणुन घ्या

नवीन वर्षात येणारा पहिला सण हा मकर संक्रात हा आहे.प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशीपरिवर्तन होते, त्याला संक्रांत असे म्हणतात.

नवीन वर्षात येणारा पहिला सण हा मकर संक्रात हा आहे.प्रत्येक महिन्यात सूर्याचे जे राशीपरिवर्तन होते, त्याला संक्रांत असे म्हणतात. एकूण १२ संक्रांती वर्षभरात येत असतात, अशा प्रकारे प्रत्येक महिन्यात 1 संक्रांत असते. परंतु मकर संक्रांतीला काही खास महत्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यामुळे या सणाला मकर संक्रांती म्हटले जाते. शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते.

2024 या वर्षात मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी साजरी केली जाईल.मकर संक्रांती हा सण गेल्या दोन वर्षांपासून १५ जानेवारीलाच साजरा केला जात आहे.मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल.

मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत वरियान योग राहील. याशिवाय या दिवशी रवि योगही तयार होत आहे. ससकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत रवि योग असेल. या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते, असे सांगितले जाते.

15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे, त्यावेळीच सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील, याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 7:15 ते 9:00 पर्यंत आहे.मकर संक्रांतीला शुभ काळात स्नान करणे शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास 31 मिनिटांचा असेल. यावेळी मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान करून काही गोष्टींचे दान करावे.

येत्या सोमवारी, म्हणजेच 15 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी, त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे, त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यासोबतच आपल्या ओंजळीत तीळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे, त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करा.

हे ही वाचा:

जनतेचे आशीर्वाद हाच माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार – डॉ. अमोल कोल्हे

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवला जातो? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss