Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Gudi padwa २०२३, मराठी नववर्षाच्या निमित्त द्या तुमच्या मित्रांना आणि परिवाराला शुभेच्छा

गुढीपाडवा हा प्रामुख्याने महाराष्ट्रमध्ये साजरा केला जातो. गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी लोकांसाठी हा सण आहे. चैत्र प्रतिपदा तिथी शुल्क पक्ष या हिंदू दिनदर्शिकानुसार महाराष्ट्रमध्ये आणि गोव्यामध्ये हा सण लोक साजरा करतात.

गुढीपाडवा हा प्रामुख्याने महाराष्ट्रमध्ये साजरा केला जातो. गुढीपाडवा हा मराठी आणि कोकणी लोकांसाठी हा सण आहे. चैत्र प्रतिपदा तिथी शुल्क पक्ष या हिंदू दिनदर्शिकानुसार महाराष्ट्रमध्ये आणि गोव्यामध्ये हा सण लोक साजरा करतात. चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होते हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडवा हा गुढी आणि पाडवा या दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. गुढीचा अर्थ विजयाचा ध्वज वाईटांवर चांगल्यांच्या विजयाचे प्रतीक तर पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी गुढीपाडव्याच्या सणाला पहाटे उठून मोठ्या काठीने किंवा बांबूने विजयाची पताका लावली जाते यासाठी पूर्वी वापरात न आलेले कापड किंवा नवीन साडी खांबावर गुंडाळली जाते चांदीचा, तांब्याचा किंवा पितळाचा कलश, वाटी, काच किंवा लोटा उलटा ठेवला जातो आणि भगव्या रंगाचे किंवा रेशमी कापडाने किंवा नवीन साडीने ही गुढी सजवली जाते.

गुढीपाडव्याचा हा सण महाराष्ट्रातील आणि गोव्यातील लोकांसाठी खूप खास असतो. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हे हिंदू नवीन वर्ष साजरे करतो. आपण गुढीपाडव्याच्या निमित्त हिंदू नववर्षाच्या आपल्या मित्रमंडळींना, परिवाराला शुभेच्छा देतो. गुढीपाडव्याच्या निमित्त आपण आपल्या मित्रमंडळीला मेसेज पाठवून मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ शकतो.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा –

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा..
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी पहाट,
उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण,
अन सुखांची बरसात..
दिवस सोनेरी,
नव्या वर्षाची सुरुवात..
गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा..
गुढीपाडव्याच्या तुम्हाला व
तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा..
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

हे ही वाचा : 

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवत कायम करून वेतन फरक द्या, बाळासाहेब थोरात

शरद पवारांबद्दल मंत्री दादा भुसे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य, राष्ट्रवादीच्या आमदारांचे वेलमध्ये उतरत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss