Friday, May 3, 2024

Latest Posts

स्वादिष्ट शीर खुर्मा कसा बनवायचा घ्या जाणून…

खाद्यसंस्कृती आणि सणवार यांचं भारतीय संस्कृतीशी अतूट नातं आहे. लहानपाणी अंकलिपीत किंवा बालभारतीच्या पुस्तकात जेव्हा ईद किंवा रमजानचा महिना असला की शीर खुर्मा नक्कीच आठवतो. शेवयाची खीर आणि सय्ख्या मेव्याची खीर त्यावर पसरलेला केशराच्या काढ्याचा सुरेख रंग आणि वेल्दोद्याचा सुगंध. आलं न तुमच्या देखील तोंडाला पाणी… चला मग पाहूया शीर खुर्मा बनवण्याची सोपी पद्दत.

शीर खुर्मा बनवण्याचे साहित्य –

  • १ लिटर घट्ट सायीचे दूध
  • १/४ कप साखर
  • ३० ग्राम बारीक शेवया
  • तूप
  • १ चमचा न खारवलेले पिस्ते (रात्रभर भिजत घालावे)
  • १० बदाम (रात्रभर भिजत घालावे)
  • ६ खारका (रात्रभर भिजत घालावे)
  • १०-१२ काजू (रात्रभर भिजत घालावे)
  • १ चमचा चारोळ्या
  • १ चमचा मनुका
  • २ चमचे सुख्या खोबऱ्याचे पातळ काप
  • १ चमचा वेलडोद्याची जाडसर पावडर
  • १ चमचा केवडा जेल
  • थोडे केशरीचे धागे

शीर खुर्मा बनवण्याची कृती –

सर्वप्रथम एक जाड बुडाचा पातेल्यात दूध तापवण्यासाठी ठेवावे. दुधाला उकळी आल्यावर दूध ढवळून गॅस मंद आचेवर करून घ्यावा. आणि दूध मध्ये मध्ये ढवळत राहावे जेणेकरून उतू जाणार नाही. दुसऱ्या गॅसवर सुखा मेवा तुपामध्ये परतून घ्यावा. १ चमचा तूप गरम करुन त्यात बदामाचे काप, खारकाचे काप, पिस्ताचे काप आणि काजूचे काप तुपांमध्ये परतून घ्यावे. बदाम आणि पिस्त्याच्या साली कडून च त्याचे काप करावे. त्यामध्येच चारोळ्या आणि सुख्या खोबऱ्याचे काप घालून ते मंद आचेवर परतून घ्यावे. गरज वाटल्यास अजून १-२ चमचे तूप घालावे. ३-४ मिनिटे मंद आचेवर परतल्यानंतर ते एका वाटीत काढून घ्यावे. त्याच पॅनमध्ये १ चमचा तूप घेऊन शेवटी मनुका परतून घ्याव्यात. मनुके फुलेपर्यत परताव्या आणि त्या वाटीमध्ये काढून घ्याव्या.

सुखा मेवा परतल्यावर १ चमचा तूप घालून मंद आचेवर शेवया परतून घ्याव्या. शेवया परताना अजिबात घाई करू नये. कारण त्या खूप जास्त परतात आणि जर शेवया परतल्या तर त्यांना फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून शेवया मंद आचेवर तांबूस रंग येईपर्यंतच परताव्यात. आता शेवया आणि सुखामेवा तयार आहे. आता दूध बारीक आचेवर १२ मिनिटे तापवल्यानंतर ते घट्ट व्हायला सुरवात होते. पाऊण वाटीपर्यत दूध कमी झाले पाहिजे. आता यामध्ये साखर घालून २ मिनिटे साखर विरघळू घ्यावी.आता सुका मेवा, मनुका आणि शेवया दुधामध्ये घालून एकत्र करून घ्यावे. आच मंदच ठेवावी. शीर खुर्मा मिक्स केल्या नंतर अजून ५ मिनिटे मंद आचेवर शिवून द्यावी. शीर खुर्मा फार घट्ट किंवा पातळ नसावा. आता वेलीची पावडर आणि केशराचे धागे घालून १ मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. नंतर केवडा जल घालून एकत्र ढवळून गॅस बंद करावा. शिर खुर्मा वाढेपर्यत घालून ठेवावा.

हे ही वाचा:

कोकणी स्टाईल बनवा पापलेट करी

काहीतरी चमचमीत खायची इच्छा होतेय तर, घरबसल्या बनवा Chole Kulche

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss