Thursday, May 2, 2024

Latest Posts

‘ऑरेंज कॅपच्या’ स्पर्धेतदेखील किंग कोहली अव्वल

किंग विराट कोहली तर एकामागून एक अश्या धावा करत आहे. आतापर्यंत स्पर्धेत कोहली याने धावांचा पाऊस पडून सर्वाधिक धाव केल्या आहेत. या ऑरेंज कॅप च्या सापरधेत कोहलीचा अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे पर्पल कॅप ची लढत आणखीनच मनोरंजक झाली आहे.

सध्या आयपीएलची क्रेझ सर्वत्र सुरु आहे. एकामागे एक असे सामने चालू आहेत. यामध्ये प्रत्येक खेळाडू आपापली कामगिरी चोख बजावत आहे. किंग विराट कोहली तर एकामागून एक अश्या धावा करत आहे. आतापर्यंत स्पर्धेत कोहली याने धावांचा पाऊस पडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. या ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोहलीच अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे पर्पल कॅपची लढत आणखीनच मनोरंजक झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर पर्पल कॅप वेगवेगळ्या गोलंदाजाकडे जात आहे. त्यामुळे पर्पल कॅपची स्पर्धा चांगलीच वाढत चालली आहे.

यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये आरसीबीची खेळी तशी क्रिकेटप्रेमींच्या मनाप्रमाणे झाली नाही. पण विराटने मात्र चांगल्याच धावा केल्या आहेत. किंग कोहलीने ७२ च्या सरासरीने ७ सामन्यांमध्ये ३६१ धावांचा पल्ला गाठला आहे. त्याचा स्ट्राईक रेटही १४८ एवढा आहे. सात सामन्यांमध्ये विराटने सात शतक आणि एक अर्धशतक गाठलं आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत रियाग पराग हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. परागने सात सामन्यात ३१८ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कोलकाताचा सुनील नारायण आहे. सुनीलने एक शतक आणि अर्धशतकाच्या जोरावर २७६ धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन आहे जो राजस्थानकडून खेळतो. त्याने २७६ धावा केल्या आहेत. तर शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर आहे. गिलनं २७३ धावा केल्या.

 युजवेंद्र चहल हा राजस्थानचा गोलंदाज यांच्याकडे सध्या पर्पल कॅप आहे. युझीने ७ सामन्यांमध्ये १८ च्या सरासरीने १२ विकेट घेतल्या. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा जसप्रीत बुमराह तर दिल्लीचा खलील अहमद आहे. दोघांनीही १०-१० विकेट घेतल्या होत्या. आज जर पंजाबविरोधामध्ये बुमराहने तीन विकेट घेतल्या तर पर्पल कॅप त्याच्याकडे जाईल. चेन्नईचा मुस्तफिजुर रहमान विकेट करून चौथ्या क्रमांकावर आहे. तर पॅट कमिन्स नऊ विकेट करून पाचव्या स्थानावर आहे.

हे ही वाचा:

‘असं’ चेक करा तुमचं मतदार यादीतील नाव… आंब्याची कुल्फी तर खूप आवडते पण बनवायची कशी? Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss