Sunday, May 5, 2024

Latest Posts

5 Healthy Fruit Juice,पचनाच्या समस्यांसाठी ‘या’ ज्यूसचा आहारात करा समावेश

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा शरीराकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अनेक आजर उद्भवण्याची शक्यता असते. आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा शरीरावर फार परिणाम होत असतो, याचा थेट संबंध आपल्या पचनक्रियेशी होत असतो. त्यामुळेच आपल्या आहारात काही पौष्टिक घटकांचा समावेश करणे आवश्यक असते. अनेक जणांना बऱ्याचदा पचनाशी संबंधित आजार होत असतात. यासाठीच आज आम्ही काही हेल्दी ज्युसविषयीची माहिती घेऊन आलो आहोत. या ज्युसचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केला तर नक्कीच तुम्हाला पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळण्यास मदत होईल.

डाळिंब ज्युस (Pomegranate juice)

डाळिंबामध्ये अधिक प्रमाणात लोह, फॉस्फरस, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन-सी यांसारखे पोषक घटक आढळतात. डाळिंबाचा ज्युस प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते. हे आतड्यांच्या आरोग्यास देखील निरोगी ठेवण्यास मदत करते. पचनसंस्था दीर्घकाळ निरोगी ठेवायची असल्यास तुम्ही डाळिंबाच्या ज्युसचा तुमच्या आहारात समावेश करू शकता.

सफरचंद ज्युस (Apple juice)

अनेकदा डॉक्टरांद्वारे सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. सफरचंदामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हा ज्युस प्यायल्याने अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.हा सफरचंदाचा ज्युस तुम्ही घरी देखील अगदी सहज बनवून पिऊ शकता. सफरचंदाचा ज्युस शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो.

बीटरूट ज्युस (Beetroot juice)

बीट हे अनेकदा रक्त वाढवण्यासाठी खाल्ले जाते. बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेने त्रास होत असेल तर बीटरूटचा ज्युस या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करेल. बीटरूटमध्ये बेटेन नावाचे तत्व असते, जे पचनसंस्थेसाठी चांगले असते. बेटेन पोटातील ऍसिडचे प्रमाण वाढवते, ज्यामुळे पचन सुधारते. तुम्ही आपल्या दैनंदिन आहारात बीटच्या रसाचा वापर करू शकता.

काकडी ज्युस (Cucumber juice)

शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी फायदेशीर ठरत असते. काकडीत अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळले जातात. तसेच यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे एक हायड्रेटिंग पेय आहे. त्यात व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. काकडीचा ज्युस बनवण्यासाठी काकडीचे छोटे तुकडे करून ब्लेंडरमध्ये पुदिना, मीठ आणि आले घालून एकत्र करा. हा रस तुम्ही रोज सकाळी नाश्त्यापूर्वी पिऊ शकता.

लिंबाचा ज्युस (Lemon juice)

लिंबाच्या (Lemon) रसामध्ये असे अनेक गुणधर्म आढळतात, जे तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे पोषक घटक असतात. रोज एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास ते पचनासाठी फायदेशीर ठरते. हे तुमचे लिव्हरही निरोगी ठेवते. लिंबाचा रस तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी देखील पिऊ शकता. यामुळे पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.अनेक वजन कमी करण्यासाठीही मध आणि लिंबाच्या रसाचा वापर केला जातो.

हे ही वाचा:

पवारांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय

Bigg Boss OTT 2 च्या विनरला मिळणार लाखांचे बक्षीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss