Thursday, May 9, 2024

Latest Posts

केळीचे साल केसांसाठी उपयुक्त , जाणून घ्या कसा

तुम्ही केळी खाल्यावर केळीचे साल टाकून देता का? पण तसे करू नका तुम्ही त्या केळीच्या सालीचा पुरेपूर वापर करू शकता. कारण केळीचे साल हे केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

तुम्ही केळी खाल्यावर केळीचे साल टाकून देता का? पण तसे करू नका तुम्ही त्या केळीच्या सालीचा पुरेपूर वापर करू शकता. कारण केळीचे साल हे केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. केळीच्या सालींमुळे तुमच्या केसांना अगदीच शाइन (shine) येते . तुम्हाला जर लांबलचक केस हवे असतील तर केळींच्या सालीमुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. केळींमधे जीवनस्त्वे व कॅल्शिअम यांचे प्रमाण भुरपूर असते. केळींच्या सालीमुळे तुम्हाला केसांच्या बऱ्याच समस्या पासून मुक्ती मिळू शकते. केळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच त्यात अँटीमायक्रोबियल (antimicrobial) हा गुणधर्म आहे जो आपल्या केसांचे संसर्गापासून (infection) पासून संरक्षण करतो. केळीच्या सालींच्या पाण्याचा वापर केल्याने आपल्या केसातील कोंडा( Dandruff) व केसातली खाज नाहीशी होते. चला तर मग जाणून घेऊया केळ्यांच्या सालींचे पाणी बनवतात तरी कसे!

सध्या अनेकांना केसांच्या समस्या सुरु असतात. आजकालच्या हवामानामुळे अनेक जण केसांच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत. प्रदूषित हवेमुळे लोकांना केसगळतीला, कोंड्याला, केसातील इन्फेकशनला सामोरे जावे लागते. काही लोकांना लांबलचक केसांची आवड असते पण केसगळती मुळे ही आवड काहीना जपता येत नसे. केळींमधे अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) चे प्रमाण जास्त असते. तुम्ही जर केसांना हे पाणी लावले तर तुमच्या केसातील कोरडेपणा हा पूर्ण पणे निघून जातो . आणि तुमचे केस मुलायम व सुंदर दिसायला लागतात. तुमचे केस दाट होण्यासाठी हे पाणी तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या केसांना छानशी चमक येईल. तर मग जाऊन घेऊया केळीच्या सालीचे पाणी कसे बनवतात त्यासाठी लागणारे साहित्य आणि तुमच्या केसांना छानशी चमक येईल.

केळीच्या सालीचे पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

केळीचे साल २
पाणी ३ कप

केळीच्या सालीचे पाणी बनवण्याची कृती:

सर्वप्रथम एक कढई घेऊन त्यात ३ काप पाणी भरून घ्यावे. ते पाणी अर्धे होई पर्यंत उकळव आणि कोमट करत ठेवा . नंतर त्यात २ केळींची साले रात्रभर भिजवून ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर ते पाणी एकत्र करून एका स्प्रे (spray) बाटलीत भरून ठेवा. आणि स्प्रे च्या साहाय्याने तुम्ही हे पाणी केसांना लावू शकता. तर अश्याप्रकारे केळीच्या सालीचे पाणी केसांना लावण्यासाठी तयार करावे.

केळीच्या सालीचे पाणी केसांना कसे लावायचे?

तुम्ही केसांना केळीच्या सालीचे पाणी कंडिशनर म्हणून सुद्धा लावू शकतात. किंवा तुम्ही हे पाणी केसांमध्ये स्प्रे करून थोडा वेळ लावून ठेऊन माइल्ड शॅम्पू (Mild shampoo) च्या मदतीने केस धूउन घेऊन अतिरिक्त पाणी काढून घ्या आणि तुम्ही बनवलेले सालांचे पाणी केसांना लावून साधारण २० मिनिटे ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवून स्वच्छ करा.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

बनवा घराच्या घरी झटपट टोमॅटो राइस

कोकण स्पेशल चमचमीत फणसाची भाजीची रेसिपी घ्या जाणून

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss