Sunday, May 5, 2024

Latest Posts

आरोग्यासाठी ओवा फायदेशीर, अनेक आजरांवरचा रामबाण उपाय

ओवा हा गृहिणींच्या स्वयंपाक घरातील एक अविभाज्य घटक आहे. पौराणिक काळापासून ओवा अनेक उपायांवरचा एक रामबाण उपाय मानला जातो.

ओवा हा गृहिणींच्या स्वयंपाक घरातील एक अविभाज्य घटक आहे. पौराणिक काळापासून ओवा अनेक उपायांवरचा एक रामबाण उपाय मानला जातो. ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळेच घरगुती उपाय म्हणून अनेकदा आजार घालवण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. याऐवजी ओवा अनेकदा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्येही सर्रास वापरला जातो. ओव्य्मध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात जे आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करत असतात. चला तर पाहूयात कोणकोणत्या आजरांसाठी ओवा फायदेशीर आहे.

पचनास मदत करते (Aids digestion)

जर तुम्हाला वारंवार पचनाच्या समस्या होत असतील तर तुमच्या तुमच्या आहारात ओव्याचा नक्की समावेश करा. ओव्याच्या लहान बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये थायमॉल नावाचे तत्व असते, ज्यामुळे शरीरातील पचनक्रिया सुरळीत होते. ओवा खाल्ल्याने अपचन, गॅस अशा समस्या दूर होण्यास मदत होते. अजवाइनच्या बियांमध्ये असलेले अल्कधर्मी गुणधर्म पोटातील अतिरिक्त ऍसिड कमी करण्यास मदत करतात.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त (Helpful in controlling blood pressure)

ओव्याच्या बियांमध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. ओवा खाल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या बिया हृदयाशी संबंधित असणाऱ्या समस्याही कमी करतात. सेलरीमध्ये थायमॉल नावाचे एन्झाइम असते, जे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांनी आहे आपल्या आहारात ओव्याचा समावेश जरूर करावा.

वजन कमी करण्यात मदत (Help in weight loss)

ओव्यामुळे चयापचय वाढवण्याबरोबरच पचन सुधारते. ज्यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते. गॅसची समस्या कमी करण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो आणि ओव्याच्या पाण्याचे मिश्रण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.म्हणूनच तुम्हला वजन कमी करायचे असल्यास नियमित आपल्या आहारात ओव्याचा समावेश करून घ्या.

संसर्गापासून संरक्षण करते (Help in weight loss)

ओव्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीमाइक्रोबियल आणि अँटीपॅरासायटिक हे गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात.ओवा सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग टाळण्यास मदत करतो. पारंपरिक औषधांमध्येही ओवायला फार महत्व आहे. पूर्वीच्या काळी पोटाशी निगडित संशय असल्या की नेहमी ओवा खाण्याचा सल्ला दिला जायचा.

सांधेदुखीवर प्रभावी (Effective on joint pain)

संधिवात आणि सांधेदुखी यांसारख्या आजारांवर ओवा एक रामबाण उपाय ठरतो. ओव्यामध्ये असलेले गॅमा-टेर्पेन्स पेप्टिक अल्सर, मधुमेह, रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.ओवा शरीरासाठी फायदेशीर असून सांधेदुखीवर तो एक प्रभावी उपाय ठरतो.

हे ही वाचा:

किरीट सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

अनिल परब यांचा विधिमंडळात सोमय्यांच्या ‘त्या’ व्हिडिओवर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss