Thursday, May 9, 2024

Latest Posts

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Manoj Jarange यांची घोषणा, मराठा उमेदवार उभा केला तर…

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. यासाठी मनोज जरांगेंनी आंतरवली सराटीमध्ये बैठक आयोजित केली होती. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीमध्ये बोलवलेल्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मराठा उमेदवार उभे केल्याने मते फुटतील, त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा पर्याय असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका

बैठकीत मनोज जरांगे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत जास्त फॉर्म भरून आपला समाज अडचणीत येऊ  शकतो. आपले उमेदवारी अर्ज सरकार रद्द करू शकतो. जास्त उमेदवारी अर्ज दाखल झाले तर आपली मतं फुटतील. त्यामुळे एक काम करा अपक्ष म्हणून एकच फॉर्म पूर्ण जिल्ह्यातून टाका. कोणता उमेदवार उभा करायचा तो निर्णय तुम्ही घ्या, मी सांगणार नाही. आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीत गेले आहे, आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही. आपला आरक्षण दिल्लीत नाहीच, असेही जरांगे म्हणाले आहेत.

राजकारण माझा मार्ग नाही, मला त्यात अडकवू नका

जिल्ह्यातून एकच अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा तसेच मराठा समाजाने कोणत्याही सभेला जायचं नाही. कोणत्याच पक्षाचा प्रचार करायचा नाही. मात्र मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचे आहे. त्यामुळे तुमच्या जर सर्वांचं मत असेल तर एक जिल्ह्यातून अपक्ष मराठा उमेदवार उभा करायचा. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्यावी लागणार आहे. तुम्ही जो उमेदवार उभा करणार आहेत तो सर्वांना मान्य आहे का? याची चर्चा करा. त्याच्याबद्द्ल लेखी माहिती मला पाठवा आणि आपण उमेदवारांची घोषणा करून टाकणार असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, राजकारण माझा मार्ग नसून, मला त्यात अडकवू नका असेही मनोज जरांगे म्हणाले.

हे ही वाचा:

झुंडशाही,पवार पर्व संपवण्यासाठी आपली लढाई – विजय शिवतारे

आपल्या बापजाद्यांनी केलेल्या अत्याचाराविरूद्ध या माणसानं.. Kiran Mane यांचं म्हणणं तरी काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss