Thursday, May 2, 2024

Latest Posts

बलात्कारानंतर पीडित तरुणीने घेतले विष, तर आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

बलात्कारानंतर पीडित तरुणीने घेतले विष, तर आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

बलात्कारानंतर पीडित तरुणीने घेतले विष, तर आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, १९ वर्षीय तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला आहे. यातली धक्कादायक बाब म्हणजे या झालेल्या घटनेनंतर बदनामीच्या भीतीने पीडित तरुणीने विष प्राशन केले असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे आरोपी असणाऱ्या तरुणाने स्वतः आत्महत्या केल्याचे उघडकीस झाले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून, या प्रकरणी पोलिसांत नोंद देखील करण्यात आली आहे.मच्छिंद्र रामू घोडके असे आत्महत्या करण्याऱ्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. संभाजीनगरातील सिल्लोड तालुक्यातील गावात एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला, तर त्या तरुणीच्या भावाला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांत गुन्हा हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणामुळे आपली बदनामी होईल या भीतीने तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे हे माहित होताच तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहरात त्याच्या बहिणीकडे आला असतांना गळाफास घेऊन आत्महत्या केली.

खोलीवर बोलावून बलात्कार केला.

पोलिसांत दाखल केलेल्या गुन्ह्याप्रमाणे, मच्छिंद्र रामू घोडके मागील काही दिवसांपासून पीडित तरुणीचा सतत पाठलाग करीत होता.” तू मला खूप आवडतेस, तू मला भेट, अन्यथा तुझ्या भावाला जिवंत मारून टाकीन, अशी धमकी तरुणीला देत होता.त्यानंतर त्याने १९ वर्षीय पिडीत मुलीला धमकी देऊन भाड्याने घेतलेल्या खोलीवर बोलावून तिच्यावर बलात्कार त्याने केला.पीडित मुलीने याबाबत तिच्या आईला घडलेला सगळा प्रकार सांगितला, त्यानंतर मंगळवारी पहाटे बदनामीच्या भीतीने या मुलीने विष प्राशन केले. ही घटना तिच्या घरच्यांचा निदर्शनास आल्यानंतर तातडीने पीडितेला दुपारी 12 वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व आता तिच्यावर उपचार करण्यात येत आहे.

गुन्हा दाखल झाल्याचे कळताच तरुणाने केली आत्महत्या….
पोलिस ठाण्यात सोमवारी पिडीत तरुणीने बलात्कार केल्याबाबतची तक्रार नोंदवल्यावर आरोपी मच्छिंद्र रामू घोडके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दरम्यान रामू घोडके हा आरोपी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या बहिणीच्या राहत्या घरी आला होता. त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्याला मिळाली.त्यामुळे मंगळवारी रात्री बहिणीच्या घरीच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा सगळा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी संभाजीनगर सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

लम्पीपासून वाचण्यासाठी जनावरांनाही पीपीई किट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss