Wednesday, May 1, 2024

Latest Posts

भारतीय लसणीच्या दरात मोठी घसरण

मागील काही दिवसांपासून कांदा, टोमॅटो या शेती पिकांचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले होते.

मागील काही दिवसांपासून कांदा, टोमॅटो या शेती पिकांचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले होते. त्यानंतर आता लसणाचे भाव देखील पडले आहे. लसणाला व्यवस्थित भाव मिळत नसून शेजारी पुन्हा चिंतेत पडला आहे. तसेच आता लसणाला भाव मिळत नसताना सरकार इराणकडून लसूण खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. लसणाच्या दरात पुन्हा एकदा घट झाल्याचे चित्र दिसून आले आहे. काहीच दिवसांपूर्वी टोमॅटो (Tomato) आणि कांद्याच्या (Onion) दरमध्ये वाढ झाली होती. पण आता तेच दर पुन्हा पडण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या बाजारातील लसणाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पण आता बाजारात इराणी आणि चायनावरुन लसूण बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा भारतीय लसणाला भाव मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. तसेच इराणचा विदेशी लसूण जळगावच्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने स्थानिक दरात आणि विक्रीत घसरण झाल्याचं व्यापऱ्यांचे म्हणणे आहे. जळगाव बाजार समितीमध्ये मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील बाजार समितीकडून या इराणी लसणीला खूप मागणी आहे. ती लसूण तितकी चवदार नसते. पण भारतीय लसणीपेक्षा इराणी लसूण मोठी असते. त्यामुळे इराणी लसणीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या लसणीची किंमत भारतीय लसणी एवढीच आहे. सरकारकडून शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत असल्याचा आरोप केला जात आहे. शेतमालाचा भाव वाढला की सरकार तो पाडण्यासाठी विदेशी माल आयात करते. तसेच निर्यात शुल्क देखील वाढवते, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते एस.बी. नाना पाटील यांनी केलाय.

काही शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा निघत नाहीये. विदेशी लसूण बाजारात आल्याने शेतकऱ्याचं अधिक नुकसान होणार असल्याचे शेतकरी संघटनेने सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या या मागणीवर आता सरकार कोणतं पाऊल उचलेले हे महत्वाचे ठरणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या लसणाला भाव मिळेल की नाही हे पाहून देखील महत्वाचे आहे.

हे ही वाचा: 

शरद पवारांचा भुजबळांवर पलटवार

लग्नसराईला होणार ‘या’ दिवसापासून सुरुवात; जाणून घ्या देवउठनी एकादशी ची तारीख व मुहूर्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss