Monday, April 29, 2024

Latest Posts

मला ४ दिवसांचा अवधी द्या, Vasant More आणि आंबेडकरांमध्ये नेमकी चर्चा काय?

वसंत मोरे (Vasant More) हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर, त्यांच्या विविध नेतेमंडळींसोबत  भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वसंत मोरे (Vasant More) यांनी २९ मार्च रोजी ‘राजगृह’ (Rajgruh) येथे वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली.

सध्या आमची सकारात्मक चर्चा

जो काही निर्णय असेल तो सांगितला जाईल, सध्या आमची सकारात्मक चर्चा झाली असून त्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी माहिती माध्यमांशी बोलतांना वसंत मोरे यांनी दिली.

त्यावर भाष्य करणे आता योग्य ठरणार नाही

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही २ मार्च पर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला सांगू की, नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल. काही चर्चा आमच्यात झाल्या असून त्यावर भाष्य करणे आता योग्य ठरणार नाही. २-३ दिवस वेळ घेऊन आम्ही महाराष्ट्रातील जनतेला आमच्या समीकरणाची माहिती देऊ. मी सध्या जे काही करतोय, त्यावर मी उत्तर देईन. मला चार दिवसांचा अवधी द्या, आमच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेविषयी मी नक्की सांगेन, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

वसंत मोरे यांनी घेतली अनेकांची भेट 

वसंत मोरे (Vasant More) यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीमध्ये पुणे (Pune) लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँगेसचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना देण्यात आली आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. पण त्यात पुण्यातील उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्याच अनुषंगाने, आता वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. वसंत मोरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत  (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर थेट रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचीसुद्धा भेट घेतली होती. वसंत मोरे हे दोन दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या बैठकीत दिसून आले होते.

हे ही वाचा:

पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे…Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss