Friday, December 1, 2023

Latest Posts

LALIT PATIL DRUGS: प्रज्ञाच्या जामिनासाठी वकिलांची कोर्टात धाव

ललित पाटील याचा ताबा मिळताच, पुणे गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त व तपासी अधिकारी सुनील तांबे यांनी अतिशय गोपनीयता बाळगत गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीड-दोन वाजता ललितला घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले.

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या (LALIT PATIL) प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरु आहेत, असा दावा तिच्या वकिलांकडून करण्यात आला आहे. त्याबद्दलचे वैद्यकीय प्रमाणपत्र (MEDICAL CERTIFICATE) वकिलांकडून न्यायालयात सादर करण्यात आले आहे. सध्या प्रज्ञा कांबळे पोलिसांच्या कोठडीत आहे. तिच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. प्रज्ञा कांबळे हिच्यावर २०१९ पासून उपचार सुरु आहेत, असे अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय अर्जाची पूर्तता करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात आले आहे. ससून रुग्णालयातून (SASOON HOSPITAL) पळून जाण्यापूर्वी ललित त्याच्या मैत्रिणी अर्चना, प्रज्ञा यांना भेटला होता, दोन दिवसांच्या भेटीदरम्यान त्यांनी त्याला २५ लाख रुपये दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे.

पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळ काढलेला ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील (LALIT PATIL) याला पुणे पोलिसांनी मध्यरात्रीनंतर नाशिकमध्ये आणले. त्यांनतर पहाटेपर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीतून त्याच्याकडून ३ किलो सोने जप्त करण्यात आले. ड्रग्सच्या पैशांमधून ललित पाटील आणि त्याच्या भावाने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.  २०२० मध्ये चाकण येथील एमडी ड्रग्जचा कारखाना पुणे पोलिसांनी उदध्वस्त करीत ललित पाटीलसह २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याचप्रकरणात तो येरवडा कारागृहात होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आजारपणाच्या नावाखाली तो ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत होता. परंतु त्याचवेळी तो एमडी ड्रग्जचे रॅकेटही चालवत होता. ससून रुग्णालयात ड्रग्जचा साठा पोलिसांच्या हाती लागताच ललित पाटील याने पळून जाण्याचे पलायन केले होते. ललित पाटील याचा ताबा मिळताच, पुणे गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त व तपासी अधिकारी सुनील तांबे यांनी अतिशय गोपनीयता बाळगत गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीड-दोन वाजता ललितला घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले. पहाटेपर्यंत पुणे पोलिसांनी ललित यास तो पुण्यातून पलायन केल्यानंतर नाशिकमध्ये ज्या-ज्या ठिकाणी आला त्या प्रत्येक ठिकाणी नेऊन चौकशी केली. तसेच, या तपासातून पोलिसांच्या हाती आणखी तीन किलो सोने लागले आहे.

हे ही वाचा : 

सर्वपक्षीय बैठकीनंतर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया

मराठ्यांना मागास ठरवणार कसं?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss