Sunday, May 5, 2024

Latest Posts

समृद्धी महामार्गावर फूड मॉलसाठी निविदा मागवल्या

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. दिवसेंदिवस हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. दिवसेंदिवस हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. या महामार्गावर वारंवार होत असलेल्या अपघातामुळे सर्वसामान्य आणि विरोधकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सरकारने उपाययोजना कराव्यात या मागणीने जोर धरला आहे. राज्य सरकारने अपघात कमी व्हावेत यासाठी पाऊले उचलली आहेत. समृद्धी महामार्गावर थांबा घेण्यासाठी ठिकाण नसल्यामुळे अपघात होत असल्याचा सूर होता. यावर आता राज्य सरकारने समृद्धी महामार्गावर रस्त्यालगतच्या सोयी सुविधा देण्याचं आज टेंडर काढले आहे.

समृद्धी महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे. समृद्धीवर महामार्गाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला. समृद्धी महामार्गावर एवढा लांब प्रवास करताना रस्त्यालगच्या सोयी सुविधा नसल्यामुळे अपघात होत असल्याचा अनेकजणांचा आरोप होता. इंधन संपल्यानंतर वाहने रस्त्याच्या कडेवर उभी राहिल्याने किंवा चालत्या गाडीत इंधन संपल्यानंतर गाडी बंद झाल्याने ही अपघात झाल्याचे परिवहन विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. याआधीही यासंदर्भात टेंडर काढण्यात आलं होतं, त्यानंतर तीन वेळा या टेंडरला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या मुदतवाढीतही एकच कंपनी सहभागी झाल्यामुळे हे टेंडर नाकारल्याचं एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली होती. राज्य सरकारकडून आज पुन्हा टेंडर काढण्यात आलेय.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. समृध्दी महामार्गावर शंभर किलोमीटर अंतरावर वाहनास थांब्याची संधी द्यायला हवी. राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांची मद्यपान करून आहे किंवा नाही याबाबत चाचणी करायला हवी. वेग नियंत्रणात ठेवावा. सरकारने समृद्धी महामार्ग ज्या गतीने पूर्ण केला त्याच गतीने सोयी सुविधा का उपलब्ध होत नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रवासात सोबत ओळखपत्र असायला हवे, अशा सूचना खासदार रामदास तडस यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा:

विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याच्या बातम्या चुकीच्या, अखिलेश यादव

शेतकऱ्यांना पाठबळ पुरवण्याचा उद्देश

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब हरियाणा येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss