Thursday, May 9, 2024

Latest Posts

KALYAN: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीच्या कामाला गती

कल्याण शहराच्या (KALYAN CITY) पूर्व भागातील ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या जवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे (DR. BABASAHEB AMBEDKAR) स्मारक उभारणीचे काम सुरू आहे. युवा पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महान कार्य कळावे, यासाठी हे एक अनोखे स्मारक उभारण्यात येत आहे.

या स्मारकामध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन, स्मारकांच्या भिंतींवर ३ डी चित्र, ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो, सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह या सर्वांची उभारणी करण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम अत्यंत गतीने सुरु आहे. या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. येत्या काही महिन्यात हे स्मारक पूर्ण होणार असून नागरिकांसाठी खुले होणार आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान स्मारकाचे उर्वरित कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड (DR. INDURANI JAKHAD) यांच्यासमवेत स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

 

यासोबतच, राज्याच्या नगरविकास विभागातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून कल्याणची विकासकामे मार्गी लागली आहेत. या विकासकामांचे भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याण पूर्व परिसरातील वालधुनी येथे नागरिकांच्या सोयीसाठी मीनाताई ठाकरे (MEENATAI THACKERAY) सभागृह उभारण्यात येत आहे. नगरविकास विभागाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या १.५ कोटी रुपयांच्या निधीतून हे सभागृह उभारण्यात येत आहे. स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांचीदेखील या ठिकाणी सभागृह उभारण्यात यावे अशी मागणी होती. गेल्या वर्षी स्थानिक नागरिकांना आणि सर्व शिवसैनिकांना शब्द दिला होता की, या परिसरात लवकरच सभागृह उभारण्यात येईल. आज याची वचनपूर्ती झाली असून येत्या काही महिन्यात हे सभागृह प्रत्यक्षात उभे राहणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (DR. SHRIKANT SHINDE) यांनी दिली. 

हे ही वाचा : 

निकारागुआच्या शेन्निस पलासियोस हिने पटकवला मिस युनिव्हर्स’चा किताब

World Cup Trophy ची किंमत तुम्हाला माहित आहे का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss