Sunday, April 28, 2024

Latest Posts

१८७ इंटरसेप्टर वाहनांना मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना आज हिरवा झेंडा दाखवून ही वाहने परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.
परिवहन विभागाच्या १८७ इंटरसेप्टर वाहनांना आज हिरवा झेंडा दाखवून ही वाहने परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली.
परिवहन विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या या इंटरसेप्टर वाहनांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.
महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दूर करून भविष्यात अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदींसह परिवहन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss