Thursday, May 2, 2024

Latest Posts

स्थानिक संस्कृती आणि वारशाला साजेशी अशी नवी विमानतळ इमारत – CM Eknath Shinde

कोल्हापूर विमानतळाच्या नवीन सुधारित टर्मिनलचे उद्घाटन आणि लोकार्पण १० मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हा नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार प्रकाश आवाडे, तसेच कोल्हापुरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथे उपस्थित राहून कार्यक्रमाचा अनुभव घेतला.
यावेळी देशभरातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात ९ हजार ८०० कोटी रुपये निधीतून १५ विमानतळ प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन देखील संपन्न झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन व लोकार्पण रिमोटची कळ दाबून करण्यात आले.
या सुधारित टर्मिनल इमारतीद्वारे दरवर्षी ९५ लाख प्रवाशांना सेवा देता येईल.

Latest Posts

Don't Miss