Thursday, May 9, 2024

Latest Posts

टीईटी परीक्षा घोटाळ्या प्रकरणी अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे, मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोटाळ्याचे प्रकरण आता थेट सिल्लोडपर्यंत पोहचले आहे. या टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात शिंदे गटातील आमदार तथा माजी महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन कन्यांची नावे समोर आली आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोघींना या घोटाळ्या प्रकरणी समावेश असल्याचे समोर येत आहे. याविषयी बोलताना अब्दुल सत्तार यांनी बदनामी करण्यासाठी कट रचला जातोय असा आरोप करत याप्रकरणाचे स्पष्टीकरण दिले आहे.

टीईटी परीक्षा घेणारे खासगी कंपन्यांचे संचालक, परीक्षा देणारे विद्यार्थी आणि परीक्षा परिषदेचे अधिकारी यांच्या सहमतांनी झाल्याचे समोर आल्यानंतर यातील काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. तसेच जे परीक्षा देणारे विद्यार्थी या प्रकरणात आरोपी आढळले आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. येणार असल्याची पोलिसांनी माहिती दिली. परीक्षेत दरम्यान गैरव्यवहार केलेल्या प्रकरणी उमेदवारांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून, त्यांना टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी आता बंदी घालण्यात आली आहे. मात्र यामध्ये आता आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे टीईटी घोटाळ्यात राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचे आता उघड झाले आहे.

या प्रकरणी बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटले,”मुलींची चुक असेल तर त्यांच्यावर बिनधास्त कारवाई करा. बदनामी करणाऱ्यांना फासावर लटकवा. या प्रकरणाची नीट चौकशी करा अशी मागणी करत सत्तार यांनी बदनाम करण्याचे काम कुणीही करु नये. सर्वांनी आपापल्या पद्धतीने दक्षता घ्यावी. याची सर्व विचारपूस करण्यासाठी शिक्षण अधिकारी आहेत”, असे आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले.

हेही वाचा : 

नक्की शिवसेना कोणाची ?, आजपासून दुसरा अंक रंगणार

Latest Posts

Don't Miss