Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Ashok Chavan Live, मुंबई महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी तयारीला लागायचं

आज १ मे महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यामध्ये आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा केला जात आहे. तर आजच महाविकास आघाडीची मुंबईमध्ये वज्रमूठ सभा पार पडत आहे. मुंबईमध्ये वांद्रे येथील बीकेसी (BKC) ग्राउंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडत आहे. यावेळी काँग्रेस चे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील जनतेला संबोधित केले आहे.

यावेळी बोलत असताना अशोक चव्हाण म्हणाले आहेत की, माविआच्या सभांना जनतेचा प्रतिसाद आहे. आज आपन एकत्र आहोत आणि एकत्र राहणार आहोत. महाराष्ट्रात नुकतीच निवडणूक या पार पडल्या आहेत. ऐतिहासिक दिनी मुंबईत माविआची आज सभा आहे. तर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. या महाराष्ट्रात एकोपाचे दर्शन घडवले आहे. सर्व शेतकऱ्याचा कौल हा मविआच्या बाजूने आहे. महाराष्ट्राचे गलिच्छ राजकारण ही जनता खपवून घेणार नाही असं देखील आज अशोक चव्हाण म्हणाले आहेत. हे गलिच्छ राजकारण लोकांना आवडलं नाही. सत्ताधाऱ्यांना लोक धडा शिकवणार असं देखील अशोक चव्हाण म्हणाले आहेत. बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं भविष्य आपण घडवू शकतो, असा मत शेतकऱ्यांनी दिलं आहे. शेतकऱ्यांनी अडचणींच्या काळात मविआच्या बाजूने कौल दिला. आपण हॅट्र्रीक साधली. विधान परिषदेचे निकाल, अंधेरी पोटनिवडणूक आणि बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल हॅट्र्रीक आहे. आपल्याला आगामी काळात सिक्सर मारायचा आहे. ही मुंबई महापालिका आपणच आणणार आहोत हा निर्धार करण्यासाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. आपल्यावर मविआ म्हणून जबाबदारी पार पाडायची आहे असं देखील अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

आगामी काळात महाविकास आघाडीला सिक्सर मारायचा आहे. मुंबई महापालिका पुन्हा जिंकण्यासाठी तयारीला लागायचे आहे. केंद्रात, राज्यात आणि स्थानिक पातळीवर सत्ता हवी आणि थ्रीपल इंजिन सरकार हवं असं म्हणतात…पण ह्यांचे इंजिन सरकार बिनकामाचे आहे अशी टीका अशोक चव्हाण यांनी भाजवर केली आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहेत की, भाजपाला मुंबई महापालिका कशाला हवी आहे, तर यांना मुंबई महापालिकचे फिक्स्ड डिपॉझिट तोडायचे आहेत. मुंबई मनपा विकासासाठी नव्हे, तर पैशांसाठी हवी आहे. उद्धवजींच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात आपल्या मेहनतीने आपण सर्वांनी महापालिका सक्षम केली. मुंबईचा विकास केला. उद्धवजींच्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे मुंबईला ताकद मिळाली. आता यांना ९२,००० कोटी दिसत आहेत. हे पैसे आपल्याला कसे वापरता येतील याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.

Latest Posts

Don't Miss