Friday, May 3, 2024

Latest Posts

मुख्यमंत्री Eknaath Shinde ८ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या वर्ष बंगल्यावर किंवा शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत.

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ वाजता महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्री त्यांच्या वर्ष बंगल्यावर किंवा शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी कोणती माहिती देणार आहेत याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नेमकं कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरेल. या पत्रकार परिषदेबाबत आधीच माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री आठ वाजताच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

सध्या राज्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना जास्त महत्व दिले जात आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत. खासदार गजनान कीर्तीकर यांनी तर जाहीरपणे याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींवर एकनाथ शिंदे काही भाष्य करणार आहेत का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर कोणते नवे वळण राजकीय समीकरणांना येईल हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरेल.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

“आदिपुरुष” चित्रपटातील गाणे झाले रिलीज, प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss