Wednesday, May 8, 2024

Latest Posts

देवेंद्र फडणवीसांकडून त्र्यंबक प्रकरणावरून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून वाद निर्माण झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दुसऱ्या धर्माच्या गटाने प्रवेशाची मागणी केल्यावरून वाद निर्माण झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांना समज देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पुरोहित संघाने केली आहे. दरम्यान, याप्रकरणाची चौकशी करण्याकरता एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी दुसऱ्या धर्माच्या एका गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाकडून करण्यात येत होता. मात्र तेथील पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ या परिसरात खूप तणाव निर्माण झाला. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. तरी देखील या ठिकाणी पुरोहितांना कोणी मनात नव्हते आणि विरोधाचे तेच कारण होते. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

.

पुरोहित संघाने संशयितांवर कारवाई करण्याची मागणी केली . याप्रकरणी एफआयर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून देण्यात आले आहे. .या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल. तर गेल्यावर्षी एका विशिष्ट जमावाने त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता.तरी देखील त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र या वर्षी देखील अशाच प्रकारचा प्रकार या ठिकाणी घडलेला बघायला मिळाला.

हे ही वाचा : 

शेवगाव, सातारा येथील हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांना केले अलर्ट

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss