Friday, May 3, 2024

Latest Posts

Pankaja Munde यांचा ऐतिहासिक मतांनी विजय होणार – Dhananjay Munde

आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघातून (Beed Loksabha Election) महायुतीकडून भाजपच्या (BJP) पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता पंकजा मुंडे यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पंकजा मुंडे यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याचे दिसत आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे यांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या (Mahayuti) सर्वच आमदार, माजी आमदार आणि पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाले, “पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित असून ऐतिहासिक मतांनी त्या निवडून येतील.”

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, “विरोधात लढलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आल्याने पंकजा मुंडे ऐतिहासिक मतांनी विजयी होतील. यापूर्वी, विरोधात असलेले सर्व लोकप्रतिनिधी आता एकत्र आल्याने पंकजा मुंडे या ऐतिहासिक मताधिक्क्याने विजयी होणार आहेत. बीड जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्येच लढत व्हायची. आता, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने महायुतीची ताकद वाढली आहे. महायुतीची आता ऐतिहासिक अशी एकजूट झाली असून शिवसेना आणि मनसेसह अनेक मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडे यांचा विजय निश्चित आहे.”

महायुतीच्या पंकजा मुंडे यांना बीडमधून महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane)यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावर टीका करताना धनंजय मुंडे म्हणाले, “बजरंग सोनावणे यांना अनेक वेळा संधी देण्यात आली त्यांनी काय विकास केला याचा हिशोब द्यावा. आधी त्यांनी काय विकासकामे केली याचा हिशोब द्यावा नंतर बीड जिल्ह्यातील विकासावर बोलावं.”

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss