Thursday, May 9, 2024

Latest Posts

महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये पुन्हा एकदा चर्चा होण्याची शक्यता

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या चर्चा सगळीकडे रंगल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(प्रकाश आंबेडकर) यांनी महाविकास आघाडीला दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे. हा अल्टिमेटम संपल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे, या पत्रकार परिषद प्रकाश आंबेडकर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याआधी महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना ‘आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका’ अशी विनंती केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नव्या चर्चा होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज महाविकास आघाडीबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. तसेच आज प्रकाश आंबेडकर आपल्या तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याची देखील शक्यता आहे. पण महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. मविआ आंबेडकरांना नवा प्रस्ताव देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी मविआची विनंती मान्य करून उद्या आपली भूमिका जाहीर करण्याचे ठरवले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. मात्र महाविकास आघाडीच्या विनंतीनंतर ही पत्रकर परिषद रद्द होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आंबडेकर यांच्या भूमिकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये असून ते महत्वाचे घटक आहे. वंचितसोबत आमची अनेकदा चर्चा झाली आहे. स्वतः प्रकाश आंबेडकर देखील चर्चेला उपस्थित राहिले. आमची कालपर्यंत चर्चा सुरु होती, आजही सुरु राहील. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला असून, तो कायम आहे. मात्र, त्या संदर्भात अजूनही काही चर्चा सुरु असून, त्या संपलेल्या नाहीत, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

जे बाळासाहेबांचं नाव ‘वापरून’ त्यांचा फायदा घेतात, ते…Kiran Mane पुन्हा एकदा चर्चेत

होळी साजरा करण्यासाठी माहीम समुद्र किनारी गेलेले ५ पाच तरुण बुडाले; पाचपैकी दोघांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss