Thursday, May 2, 2024

Latest Posts

कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे, सांगलीची जागा शिवसेनेला; जागा वाटपावरून संजय राऊत म्हणाले…

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये मतदान केले जाणार आहे. त्यातच आता महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीची कोल्हापूरची (Kolhapur) जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. तर सांगलीतील जागा शिवसेनेला देण्यात येणार असल्याचे खासदार संजय राऊतांनी सांगितले आहे. शिवसेनेकडे असलेली रामटेकची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. सांगलीमधील डबल केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक लढवतील, असे उद्धव ठाकरे यांनी या आधीच सांगितले आहे. त्यामुळे सांगलीमधील काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. सांगलीची जागा ही शिवसेनेला देण्यात आली असून त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कोल्हापूर ही आमची सीटिंग जागा आहे. ती जागा काँग्रेसला देण्यात येत आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज हे आमचे उमेदवार असतील. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ही शिवसेनेला देण्यात येईल. त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे हे सांगलीमध्ये जाणार आहेत. त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांसाठी ते सभा घेणार असून पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात येईल. हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्याशी सध्या चर्चा सुरु आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले. भाजप हा दुसऱ्याची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोर पळवणारा पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत. सर्व फोडलेली पोर आमची ते घेऊन ते बसले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

शिवतीर्थावर मोठी जनासभा झाली. मोठ्या शक्ती बरोबर लढत आहेत. काल शिवाजी पार्कवर इंडियाआघाडीची महाप्रचार सभा झाली. त्या बैठकीसाठी इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहिले होते. राहुल गांधी हे देशातील लोकप्रिय नेते आहेत. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे , ते झुकत नाहीत. हा त्यांचा बाणा या देशातील लोकांना आवडत आहे. जे लोक शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही आम्ही लढणारे लोक आहोत, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

दहा वर्षे रसिकांचे करत असलेल्या मनोरंजनाला कुशल बद्रिकेचा रामराम,शेअर केली भावुक पोस्ट

रवी जाधवसह नामवंतांनी केले ‘अमलताश’चे कौतुक,कशी आहे चित्रपटाची कथा ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss