Sunday, May 5, 2024

Latest Posts

महाराष्ट्राच्या राजकारणात आता दुसरा भूकंप? धाकट्या पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मुळात राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? हे कळायला मार्ग नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मुळात राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? हे कळायला मार्ग नाही. कधी बुक्की तर कधी डोळा मारणारे दादा आता महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर आहेत अश्या चर्चा चांगल्या रंगू लागल्या आहेत अश्यात आता अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना आणखी उधाण हे आलं आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दुसरा भूकंप होणार असल्याची चिन्ह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसेच न्यू इंडियन एक्स्प्रेसने एक वृत्त दिले आहे आणि त्या वृत्तात म्हंटले आहे की, अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं या वृत्तात म्हंटले आहे. तर अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळालं आहे. नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. २०१९ साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. म्हणूनच, अजित पवार यांच्यासोबतच शरद पवारांच्याही मनात नेमकं काय आहे, याबाबत आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss