Monday, November 20, 2023

Latest Posts

MANOJ JARANGE PATIL: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मराठा आरक्षणाचा आवाज दुमदुमणार

या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागात आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहोत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलतांना जरांगे-पाटील यांनी दिली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या (MARATHA RESERVATION) मुद्यावरून राज्यभरात चर्चा आणि आंदोलन केले जात आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा अट्टहास करून लढा देणारे मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे-पाटील (MANOJ JARANGE-PATIL) यांची आज अर्थात २० नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील (THANE DISTRICT) कल्याण (KALYAN) येथे सभा होणार आहे. मराठा समाजाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी मनोज जरांगे-पाटील कल्याण तालुक्यातील कोळसेवाडी (KOLASEVADI) या भागात येणार आहेत. कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर पोटे मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांच्या ठाणे (THANE) जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांची सभा पार पडणार आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ (MHARAL), वरप (VARAP), कांबा (KAMBA), बिर्ला गेट (BIRLA GATE), शहाड स्टेशन (SHAHAD STATION) परिसर याठिकाणी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेचे बॅनर लावण्यात आले आहेत. ‘आवाज मराठ्यांचा’, साथ जनमानसांची, ‘एक मिशन- मराठा आरक्षण’ , ‘एक मराठा-लाख मराठा’ अशा आशयाचे बॅनर जागोजागी पाहायला मिळत आहेत. सोमवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास कल्याण पूर्व (KALYAN EAST) येथील पोटे मैदानात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. वीस हजार लोकांची क्षमता असणाऱ्या या मैदानाचे आठ सेक्टर करण्यात आले आहे. या ठिकाणी सहा एलईडी स्क्रीन (LED SCREEN) लावली जाणार आहे. रस्त्यावर फुलांचा सडा टाकून जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा समाजाकडून बाईक रॅली (BIKE RALLY) काढत शक्ती प्रदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा दौरा सुरू करणार आहोत. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा मी जाहीर करेन. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागात आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहोत, अशी माहिती काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलतांना जरांगे-पाटील यांनी दिली होती.

हे ही वाचा : 

पॅन कार्ड होणार बंद।If PAN card is not linked with Aadhaar, PAN card will be closed. अंतर्वस्त्र पाहिलीत, तर त्यावर कमळंच आहे : संजय राऊत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss