Monday, May 6, 2024

Latest Posts

     “म्हातारं लयं खडूस”;SADABHAU KHOT यांनी SHARAD PAWAR यांना गावरान भाषेत डिवचलं

हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय;

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अत्यंत जोरदार सुरु आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत चांगली रंगताना दिसत आहे. आज माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार  रणजीतसिंह निंबाळकरांच्या (Ranjitsingh nimbalkar)  प्रचारासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)हे प्रचार सभेत उपस्थित होते. त्याप्रचारादरम्यान शरद पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या ८४ व्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मुलीच्या म्हणजेच बारामती लोकसभ मतदारसंघाच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांच्या प्रचारासाठी रणांगणात उतरल्याने विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहे.यावर आज सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या वयाचा उल्लेख करत “म्हातारा” अशा एकेरी शब्दात उल्लेख करत शरद पवारांवर जोरदार टीका केली.

प्रचार सभेत सदाभाऊ खोत म्हणाले की,”लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे. या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत”.असे ही ते म्हणाले.

दरम्यान “मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करु द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का? हे म्हणत विकासासाठी अजित पवार महायुतीत आले”, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

   

Latest Posts

Don't Miss