Friday, May 10, 2024

Latest Posts

संजय राऊतांची आज पुन्हा ईडी कार्यालयात चौकशी

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे.

मुंबई : राज्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचलेलं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आज चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश ईडीकडून संजय राऊत यांना देण्यात आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं संजय राऊत यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. (Patra Chawl Scam)

हेही वाचा

शिंदे गटाच्या १६ आमदारांवर आज होणार सुनावणी

 

प्रवीण राऊत शिवसेना नेते संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाची (म्हाडा) जागा आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीनं प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांची 9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी ईडीकडून संजय राऊतांची चौकशी करण्यात आली होती.

हेही वाचा

आर्यन खान ची कल्ब मध्ये मित्रांसोबत पार्टी; व्हिडिओ व्हायरल

 

शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकवर्तीय प्रवीण राऊतांचं नाव PMC घोटाळ्यातही आलं होतं. ज्याचा तपास अजूनही सुरु आहे. याप्रकरणाच्या तपासादरम्यान असं आढळून आलं की, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्या बँक खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्या बँक खात्यात 55 लाख रुपये पाठवण्यात आले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबानं दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. याप्रकरणी वर्षा आणि माधुरी यांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Latest Posts

Don't Miss