Monday, May 6, 2024

Latest Posts

ठाकरे गटाच्या आमदारांचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे आणि तक्रारदाराच्या फोन संभाषणाची क्लिप माझ्याकडे…

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाला चांगला वेग आल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाचे ३ आमदार सध्या अडचणीत सापडले आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) अमरावती कार्यालयातून नोटीस पाठविण्यात आली आहे. अवैध मालमत्तेची चौकशी करण्यासाठी १७ जानेवारी रोजी त्यांना अमरावतीच्या कार्यालयात बोलविण्यात आलेलं आहे. या नोटीशीनंतर माध्यमांशी बोलताना नितीन देशमुख म्हणाले कि, “मालमत्तेबाबत १७ जानेवारी रोजी जबाब नोंदविण्याचे आदेश नोटिशीत देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी भावनाताई गवळी यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान कलम ३५३ नुसार माझ्यावर गुन्हा दाखल झाला. आता अमरावती येथून एसीबी कार्यालयाची नोटीस आली आहे. माझे म्हणणे मी त्यावेळी मांडेन.” नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तक्रारदाराच्या फोन संभाषणाची क्लिप त्यांच्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नितीन देशमुख यांच्या आरोपावर शिंदे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तक्रारकर्ता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आली आहे. एसीबीला तक्रारदार संदर्भात माहिती मागितली असून तक्रारदार तोच आहे, असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् त्या व्यक्तीची ऑडिओ क्लिप माध्यमांसमोर ठेवल्या जातील, असेही देशमुख म्हणाले. आतापर्यंत नागपूर पोलिसांसह अकोला लोहमार्ग पोलीस आता एसीबीकडून नोटीस प्राप्त झाली असून हे सर्व माझ्याविरुद्ध षडयंत्र रचल्या जात असल्याचे ते म्हणाले. १७ तारखेला मी अमरावतीमधील कार्यालयात हजर राहणार आहे, असे नितीन देशमुख यांनी सांगितलं.

राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि आता बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना एसीबीनं नोटीस पाठवली आहे. १७ तारखेला नितीन देशमुख अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहेत.

हे ही वाचा:

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना यांच्या चित्रपटाचा ट्रेलर आला समोर, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार चित्रपट

अमूलचे एमडी आरएस सोधी यांचा राजीनामा, जयेन मेहता सांभाळणार पदभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss