Sunday, May 5, 2024

Latest Posts

Sharad Pawar Live, राजकीय चर्चांवर अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण, कुठलीही बैठक ही…

आज स्वतः शरद पवार यांनी सर्व राजकीय चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले आहेत की, ही केवळ तुमच्या मनातील चर्चा आहे असं शरद पवार म्हणाले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मुळात राष्ट्रवादीमध्ये नेमकं चाललंय काय? हे कळायला मार्ग नाही. कधी बुक्की तर कधी डोळा मारणारे दादा आता महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर आहेत अश्या चर्चा चांगल्या रंगू लागल्या आहेत अश्यात आता अजित पवारांकडे ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चाना आणखी उधाण हे आलं आहे. यावर आज अखेर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण हे दिले आहे.

आज स्वतः शरद पवार यांनी सर्व राजकीय चर्चांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना शरद पवार म्हणाले आहेत की, ही केवळ तुमच्या मनातील चर्चा आहे असं शरद पवार म्हणाले आहेत. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारही पक्षाचं काम करत आहेत. तसेच अजित पवार यांनी कुठलीही बैठक ही बोलावली नाही असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. तसेच सर्व सहकारी एकत्रित मिळून पक्षाला मजबूत करण्याचं काम करत आहेत. या सर्व चर्चा केवळ माध्यमांच्या मनातील चर्चा आहेत. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याच्या मनात अश्या चर्चा नाहीत असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दुसरा भूकंप होणार असल्याची चिन्ह मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अजित पवार हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चांना उधाण आलं आहे. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. तसेच न्यू इंडियन एक्स्प्रेसने एक वृत्त दिले आहे आणि त्या वृत्तात म्हंटले आहे की, अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आहे. या ४० आमदारांच्या सह्यांचं पत्र अजित पवार यांच्याकडे आहे. जर वेळ आली तर राज्यपालांना हे पत्र अजित पवार देतील. त्यामुळे सरकारला धोका निर्माण होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवलं तर हे पाऊल अजित पवार उचलतील. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं या वृत्तात म्हंटले आहे. तर अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळालं आहे. नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

मुंबई मेट्रो प्राधिकरणाला सुप्रीम कोर्टाने झापले, १० लाखांचा दंड

Eid-ul-Fitr 2023, भारतात ईद-उल-फित्र कधी साजरी होईल, ईदची नेमकी तारीख आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss