Monday, April 29, 2024

Latest Posts

पवारांच्या राजीनाम्याबाबत ठाकरे गटाने केला मोठा दावा

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी दिलेल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आधी शरद पवारांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केल्यानंतर पुढचे जवळपास तीन तास सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांची मनधरणी करत असल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं.

गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी दिलेल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. आधी शरद पवारांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केल्यानंतर पुढचे जवळपास तीन तास सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांची मनधरणी करत असल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी पुनर्विचार करण्यासाठी २ ते ३ दिवसांचा वेळ मागितला असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता ठाकरे गटानं खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे आता या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटामुळे राज्यात कधीही भूकंप होईल असं वातावरण असल्याचा दावाही ठाकरे गटानं केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे अशा खबरी पसरत असतानांच अचानक शरद पवार यांनी राजीनामा दिल्याचं सूत्र चालू झालं व राज्याच्या राजकारणात कधीही कोणता भूकंप होऊ शकतो असे वातावरण पवारांनी राजीनामा देऊन सिद्ध करून दाखवला . त्यामुळे नेमकं कारण राजीनाम्यात आहे काय?” असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.तर अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटन व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी जिल्हा स्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो”, असंही अग्रलेखात नमूद केलं आहे.

 

सम्बधित कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांचे भाषण लिहून आणले होते. असे कधी होत नाही. म्हणजे त्यांच्या भावनिक आवाहनाचा व राजीनाम्याचा मसुदा त्यांनी काळजीपूर्वक तयार करून आणला होता व त्यानुसार त्यांनी सर्व काही केले. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि आकांत केला. पवारांच्या चरणाशी काहींनी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी भाषा देखील केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपात आहे व पक्ष अशा तऱ्हेने फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा सेक्युलर विचार पवारांच्या मनात आला असेल तर त्यात चुकीचे नाही”, असा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे. राज्यातील अनेक नेते भाजपाकडे जाण्याच्या वाटचालीवर आहेत व त्यातील अनेक नावे पवारांच्या पक्षातली आहेत. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन सगळ्यांना दरवाजे उघडे केले. अशा शब्दांत ठाकरे गटानं गंभीर दावा केला आहे.

हे ही वाचा : 

बंगालच्या उपसागरावर ‘Mocha’ चक्रीवादळाचं संकट, जाणून घ्या सविस्तर

वाय. बी. सेंटरमधील चर्चेनंतर प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss