Monday, April 29, 2024

Latest Posts

कार्यकर्त्यांचा आधार हरपला, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे निधन

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील यांचे निधन झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल मिडीयाच्याद्वारे मिनाक्षी पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या – ज्येष्ठ नेते शरद पवार 

माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या एक झुंजार नेत्या अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक जनआंदोलनात त्या अग्रस्थानी असायच्या. मीनाक्षीताईंच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले आहे. पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. एक अभ्यासू नेत्या अशी ख्याती असणाऱ्या मीनाक्षी पाटील यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!

संपूर्ण कुटुंबचं शेतकरी कामगार पक्षाशी जोडलेलं- उपमुख्यमंत्री अजित पवार

शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. मिनाक्षीताई पाटील यांचं संपूर्ण कुटुंबंच शेतकरी कामगार पक्षाशी जोडलं गेलं आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे संस्कार झाले. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन मोर्चे, आंदोलनं केली. त्यांचं जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होतं. अलिबाग विधानसभेचे त्यांनी तीन वेळा प्रतिनिधित्व केले. सन १९९९ साली तत्कालिन विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्या कार्यरत होत्या. परखड वक्तव्य व प्रशासनावर असलेली पकड यामुळे त्यांचा संपूर्ण रायगड जिल्ह्यात दरारा होता. कार्यकर्त्यांचा आधार असणाऱ्या मिनाक्षीताईंच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पाटील कुटुंबियांच्या तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

हे ही वाचा:

पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे…Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss