Wednesday, May 8, 2024

Latest Posts

गौतम अदानींच्या अडचणीत होणार वाढ, हिंडेनबर्ग अहवालावर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

हिंडेनबर्ग (Hindenburg) रिसर्च सेंटरने काही दिवसांपूर्वीच अदानी (Adani Group) समुहासंदर्भात एक अहवाल सादर केला. या अहवालातून अदानी समुहावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. या अहवालानंतर अदानी समूहाचे संचालक, सर्वेसर्वा गौतम अदानीं (Gautam Adani) हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या अहवालाचे परिणाम हे लवकरच शेअर बाजारात दिसले. शेअर बाजारामध्ये अदानी समूहाचे अनेक शेअर्सची किंमत घसरली आहे. या मुळे गौतम अदानी हे जगातील श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. गौतम तर भारतामध्ये देखील राजकीय वातावरण या प्रकरणामुळे चांगलेच तापलेले आढळले आहे. त्याच बरोबर आता हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे गौतम अदानी यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण हिंडेनबर्ग रिसर्च सेंटरने अहवालाच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आणि शुक्रवारी सुप्रीम कोर्टात या याचिकेची सुनावणी होणार आहे.

अमेरिकेत असलेल्या हिंडेनबर्ग (Hindenburg) या संस्थेने २४ जानेवारी रोजी अदाणी समूहावर एक अहवाल सादर केला होता. त्यानंतर भारतासह जगभरात एकच खळबळ उडाली आहे. कारण हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी समूहाने अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंग फसवणूक केल्याचा आरोप केला.तसेच अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहेत. यानंतर हिंडेनबर्ग संस्थेने जाहीर केलेल्या अहवालाच्या आधारावर वकील एमएल शर्मा (ML Sharma) आणि विशाल तिवारी (Vishal Tiwari) यांनी सुप्रीम कोर्टात (supreme court) याचिका दाखल केली आहे. वकील एमएल शर्मा आणि विशाल तिवारी यांनी सुप्रिमी कोर्टात सादर केलेल्या याचिकेत ५०० कोटींवरील उच्च उर्जा कर्जासाठी मंजुरी धोरणासाठी विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंडेनबर्ग अहवालात अदानी समूहावर लावण्यात आलेल्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यावर विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या सूचनाही सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आल्या आहेत. याशिवाय एसआयटीमध्ये सेबी, सीबीआय आणि ईडीसह अन्य तपास यंत्रणांचा समावेश करण्याची मागणी याचिका कर्त्यांनी याचिकेत केली आहे. करण्यात आली आहे.


हिंडेनबर्ग या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालाच्या आरोपांनंतर अदानी समुहाचे सर्वे सर्व गौतम अदानी हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अदानी समूहाच्या शेअरची किंमत जगातील शेअर बाजारातून घसरली असून, गौतम अदानी हे सुद्धा जगातील श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. तसेच भारत देखील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून गौतम अदानींच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आले आहेत आणि त्याच बरोबर भारत सरकारने लवकरात लवकर गौतम अदानींची चौकशी करावी अशी मागणी सरकारला केली जात आहे. त्याच बरोबर सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या मुळे गौतम अदानी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

हे ही वाचा : 

Aditya Thackeray यांची तोफ पुन्हा एकदा त्याच गावात धडाडणार, सभेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात

यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss