Thursday, May 9, 2024

Latest Posts

New Parliament Building Inauguration, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला घातला दंडवत

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले आहे. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे.

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले आहे. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे. आणि आज अखेर देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून संसद भवनाच्या पूजेने या सोहळ्याला सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

अखेर आज नवीन संसद भवनाचे उदघाटन हे झाले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड हा पंतप्रधान मोदी यांच्याकडे सुपूर्द केला. तर हा राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात पूजेने झाली. पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते.

सेंगोलच्या स्थापनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन केले आणि ते देशाला समर्पित केले. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इमारतीच्या बांधकामात काम करणाऱ्या कामगारांचा गौरव केला. उद्घाटनानंतर सर्वधर्मीय प्रार्थना सभा झाली. बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारशी, मुस्लिम, शीख यासह अनेक धर्मांच्या धार्मिक नेत्यांनी सर्वधर्मीय प्रार्थनेत प्रार्थना केली. यामध्ये पंतप्रधान आणि इतर वरिष्ठ उपस्थित होते.

सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते. प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता.

Latest Posts

Don't Miss