Wednesday, May 1, 2024

Latest Posts

दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन, तर सामनातून मोदी सरकारवर घणाघाती टीका

नवीन संसद भावनांचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतं आहे. आज एकीकडे हा सोहळा पार पडत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून मोदी सरकारवर जोरदार टीका ही करण्यात आली आहे.

आज संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या कर्यक्रमाकडे लागले आहे. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन होत आहे. नवीन संसद भावनांचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडतं आहे. आज एकीकडे हा सोहळा पार पडत आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना मधून मोदी सरकारवर जोरदार टीका ही करण्यात आली आहे.

आज सामनातून मोदी सरकारवर जोरदार टीका ही करण्यात आली आहे. “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डावलून नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज होत आहे. हे संकेत आणि परंपरेला धरून नाही. राष्ट्रपती याच देशाच्या व संसदेच्या प्रमुख आहेत. संसदेवर अशा प्रकारे ताबा मिळवणे हे लोकशाहीला घातक आहे. भाजप वगळता बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी यावर युद्ध छेडले आहे”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

तसेच सामना या वृत्तपत्रात पुढे म्हणण्यात आले आहे की, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग’, असे तुकोबा बोलून गेले. संतांच्या वाणीतील हे अमर सत्य आहे. रात्रंदिवस लोकशाही वाचविण्यासाठी निरंतर झगडा आपल्या देशात सुरू आहे. आज दि. २८ मे रोजी दिल्लीत नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. संसद भवनाचे उद्घाटन कोणी करावे, याबाबत नवा वाद निर्माण झाला. नव्या संसदेचे उद्घाटन परंपरेने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे, अशी मागणी सर्वप्रथम श्री. राहुल गांधी यांनी केली व बहुतेक सर्वच विरोधी पक्षांनी ती मान्य केली. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. हे लोकशाही संकेत व परंपरेस धरून नाहीं. राष्ट्रपतींना साधे निमंत्रणही नाही, असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.

तसेच आजच्या या उद्घाटन सोहळ्याला देशभरातील ज्येष्ठ मंत्री, २५ राजकीय पक्षांचे सदस्य आणि धार्मिक नेत्यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर काँग्रेससह २१ राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या मुद्द्यावर देखील सामनात देखील जोरदार टीका ही करण्यात आली आहे. विरोधकांच्या बहिष्काराची पर्वा न करता पंतप्रधान मोदी हे संसदेच्या उद्घाटन सोहळय़ात भाषण करतील व त्यांनीच जमा केलेला श्रोतृवृंद तेथे टाळया वाजवेल. लोकशाहीसाठी हा सर्वात मोठा धोका आहे. संसदेच्या उद्घाटनास देशाच्या राष्ट्रपतींना निमंत्रण नाही, विरोधी पक्षनेत्यांना मान नाही. सर्व काही ‘मी’ म्हणजे मोदी. हा अहंकारच आहे, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

New Parliament Building Inauguration, PM मोदींनी केले नवीन संसद भवनाचे उद्घाटन, जाणून घ्या सविस्तर माहिती

चहा पत्तीचा फक्त चहा बनविण्यासाठी नाही तर ‘या’ गोष्टीसाठी देखील फायदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss