Thursday, May 2, 2024

Latest Posts

Shivrajyabhishek Din 2023, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा नेमकं काय सांगते? वाचा सविस्तर…

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते की ज्यांची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. अनेक लोक महाराजांना प्रचंड मानतात तसेच त्यांच्या थोर विचारांना जोपासतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेच्या राजाची थोरवी अतिशय महान आहे. महाराजांचा इतिहास मोठ्यांपासून ते अगदी लहानांपर्यंत सर्वांनाच तोंडपाठ असतो हे वास्तव आहे.

छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकासाठीच प्रेरणास्त्रोत आहेत. आपल्या वडिलांचे म्हणजेच शहाजीराजांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या १२ व्या वर्षी पूर्ण केले. म्हणूनच शहाजीराजांनी महाराजांना राजमुद्रा आणि प्रधानमंडल देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले. महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकालाच राजमुद्रेत नेमके काय व त्याचा अर्थ काय होतो हे माहित पाहिजे. म्हणूनच हा सदर लेख महाराजांचा आदर तसेच मान राखणाऱ्या प्रत्येकासाठी आहे.

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा राजमुद्रे चा अर्थ आहे. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव राजमुद्रेवरून सहज लक्षात येतात. राजमुद्रेतील प्रत्येक शब्ध विचारपूर्वक मांडण्यात आला आहे. मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले होते.

“शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल” हा हेतू राजमुद्रेतून स्पष्ट केला आहे. तसेच, हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.

हे ही वाचा:

मासिक पाळीच्या पूर्वी महिलांना या ‘Syndrome’ चा सामना लागतो करावा…

‘एनसीपीए’च्या माध्यमातून प्लॅनेट मराठी जपणार मराठी कलासंस्कृती

पंकजा मुंडेंच्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss