Wednesday, May 8, 2024

Latest Posts

Teddy Day 2023, जाणून घ्या, टेडी बियर चा इतिहास

व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन विकचा चौथा दिवस हा टेडी डे (Teddy Day) म्हणून साजरा केला जातो. आपण लहान होतो तेव्हा आपल्यापैकी अनेकांकडे टेडी बियर (Teddy Bear) होता.

व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन विकचा चौथा दिवस हा टेडी डे (Teddy Day) म्हणून साजरा केला जातो. आपण लहान होतो तेव्हा आपल्यापैकी अनेकांकडे टेडी बियर (Teddy Bear) होता. कारण टेडी बियर हा एक मऊ आणि सर्वात प्रिय खेळण्यांमधले एक खेळणे आहे. मुलींसाठी हा एक आनंदाचा दिवस असतो. कारण प्रत्येक मुलीला हा टेडी खूप आवडत असतो. त्यामुळे प्रियकराला त्याच्या प्रियसीला टेडी बिअर देऊन त्यांना त्याच्या प्रियसिला खुश करण्याचा एक चांगलीच संधी मिळते. तुम्हाला जर तुमच्या भावना खास व्यक्तीला किंवा तुमच्या मित्र मैत्रिणी समोर व्यक्त करायच्या असतील तर तुमच्या भावना तुम्ही टेडी बिअर देऊन व्यक्त करण्याचा व्हॅलेंटाईन वीक हा उत्तम मार्ग आहे.

आपल्या खास व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक खास स्मित हास्य आणने आणि तिला दिलेली भेट वस्तू तीच्या सोबत आयुष्भर राहणे याहून जास्त आनंद नाहीच. टेडी बियर हे असे खेळणे आहे जे वयाची पर्वा न करता त्याचा आनंद घेता येतो. व्हॅलेंटाईन वीकचा पूर्ण दिवस हा आपण स्वतः ला समर्पित करू शकतो. १० फेब्रुवारी रोजी टेडी डे साजरा केला जातो. आणि सर्वात चांगली गोस्ट म्हणजे टेडी बेअर हे कोणाला हि देऊ शकतो. मुले किंवा मुली हे एकमेकांना टेडी देऊ शकतात. बऱ्याच कथांमध्ये टेडी बेअर हा सिक्रेट पार्टनर (Secret Partner) असतो. अनेक जण जेव्हा त्यांना एकटेपणा वाटत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या टेडी बियर ला मिठी मारून स्वतःच्या आत्म्यांना उतेजन देऊ शकता.

टेडी डे चे मूळ संस्थापक हे अजून कोणाला माहितीच नाही. किंवा नक्की टेडी बियर चा इतिहास काय आहे हे माहित नसेल इतिहास सांगणार आहोत. अस्वलासारख्या दिसणाऱ्या या सॉफ्ट टॉयची कथाही खूप भावूक आहे. १९०२ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थिओडोर टेडी रुझवेल्ट (Theodore Roosevelt) मिसिसिपी राज्याला भेट देण्यासाठी गेले होते. मिसिसिपीचे गव्हर्नर अँड्र्यू एच लाँगिनो यांनी त्यांना राज्याला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर टेडी रुझवेल्ट अस्वलाच्या शिकारीला गेले, पण त्यांना एकाही अस्वलाची शिकार करता आली नाही. हे पाहून, रूझवेल्टचा सहाय्यक होल्ट कॉलियरने एक बनावट काळा अस्वल झाडाला बांधला जेणेकरून थिओडोर टेडी रूझवेल्ट त्याची शिकार करू शकेल. जेव्हा राष्ट्रपती त्या अस्वलाची शिकार करायला आले तेव्हा त्या अस्वलाची निरागसता पाहून ते त्यावर गोळी झाडू शकले नाहीत आणि पुन्हा परतले. राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट परतल्यानंतर या घटनेचे वृत्त अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आले. त्या काळात अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय व्यंगचित्रकार क्लिफर्ड यांनी या घटनेचे कार्टून रूममध्ये रूपांतर केले, त्यानंतर हे व्यंगचित्र राजधानी वॉशिंग्टन वृत्तपत्रात तेव्हा १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाले.

वृत्तपत्रातील कार्टूनपासून प्रेरित होऊन ब्रुकलिनचे दुकानदार मॉरिस मिक्टोम आणि त्यांच्या पत्नीने अस्वल तयार केले. अस्वल तयार झाल्यानंतर, दोघांनी हे टेडी अस्वल राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांना समर्पित केले, ज्यांच्या नावावरून अस्वलाचे नाव टेडी बेअर ठेवण्यात आले. हे टेडी बेअर राष्ट्रपती रुझवेल्ट यांनाही आवडले होते, त्यानंतर दुकानदार मॉरिस मिक्टोम यांनी त्यांची परवानगी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टेडी बनवण्यास सुरुवात केली. पुढे काही दिवसात त्यांनी टेडी बेअर्सची कंपनी उघडली. आणि जगात टेडी बिअर बनवण्याची सुरुवात झाली होती.

प्रत्येक वर्षी प्रत्येक जोडप आणि तरुण लोक आपल्या खास व्यक्तीला टेडी बियर देऊन व्हॅलेंटाईन विकी साजरा करतात. त्या दिवशी तुम्ही तुमची पत्नी, तुमचा जोडीदार, तुमचा मित्र आणि इतर प्रियजनांना एक टेडी तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. टेडी बियर एखाद्या व्यक्तीला भेट देणे हे आपुलकीचे लक्षण आहे. टेडी बियर हा आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते.

हे ही वाचा : 

Propose Day 2023, तुम्हाला माहित आहे का, प्रपोज गुडघ्यावर बसूनच का करतात?

Valentine’s Day 2023, मुलींना प्रपोज करायचे ? तर या ट्रिक वापरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss